ठळक मुद्देअभोणा परिसरात उन्हाचा तडाखा
अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गुरुवारी (दि.८) १४५ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कमाल १ हजार २७० रुपये, किमान तीनशे रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. सामाजिक अंतर राखत लिलाव पार पडले.अभोणा परिसरात उन्हाचा तडाखाअभोणा : कोरोनाचे संकट गडद झाले असतानाच उन्हाचा तडाखाही वाढत आहे. शहरात गुरुवारी (दि.८) पारा ३८ अंशावर पोहोचला असून, तापमान चाळिशीकडे सरकले आहे. अगोदर लॉकडाऊनमुळे घरातच असणाऱ्या नागरिकांना उकाड्याने त्रस्त केले.