शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:46 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ठळक मुद्दे नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य फळबागांसाठी भयानक ठरत आहे. पाण्याचे संकट, रोज आटत चाललेले जलस्रोत यामुळे बागा वाचवण्याचे शेतकºयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास हजारो हेक्टरवर आहे. त्यामध्ये विविध फळपिक बागांचा समावेश आहे.यावर्षी केलेली नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकºयांकडे आहे. शिवाय दरिदवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचिवता येतील का यासाठी कृषी विभागाने वाचवा अभियान हाती घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी ह्याबाबत शेतकºयांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.फळबाग वाचवा अभियानात सुचिवलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकºयांना सजग करण्याचे काम केले जात असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.उपाययोजना सांगतांना अरविंद पगारे यांनी झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती शेतकºयांना दिली आहे. ही माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभियानात आच्छादनाचा वापर, मडका सिंचनाचा उपयोग, सलाइनच्या बाटल्यांचा वापर, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, शेडनेटची सावली करणे, बाष्परोधकांचा वापर, ठिबक सिंचन, बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी, झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे आदी उपायांचा जागर करण्यात येत असून शेतकरी प्रतिसाद देत आहेत.