शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये धुसफुस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:32 IST

कॉँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमक्ष एकमेकांचा पाणउतारा करण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच लागण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली असून, नाशिक जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे पक्षाने विभाजन करून दोन अध्यक्षांचे कार्यक्षेत्र निश्चित केले असताना आता त्यातही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केल्याने वाद निर्माण झाला आहे.

नाशिक : कॉँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमक्ष एकमेकांचा पाणउतारा करण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच लागण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली असून, नाशिक जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे पक्षाने विभाजन करून दोन अध्यक्षांचे कार्यक्षेत्र निश्चित केले असताना आता त्यातही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्टवादी कॉँग्रेसने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक केली असून, दिंडोरीची जबाबदारी अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्याकडे तर नाशिकची जबाबदारी कोंडाजीमामा आव्हाड यांच्यावर आहे. दोन्ही मतदारसंघाचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असताना दिंडोरीचे अध्यक्ष पगार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात हस्तक्षेप केल्याची बाब आव्हाड यांना चांगलीच खुपली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची कामगार आघाडी स्वतंत्र असून, त्यासाठी स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाही इगतपुरीचे उमेश खातळे यांची या सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.आव्हाड यांचा आक्षेपरवींद्र पगार यांची स्वाक्षरी असलेले नियुक्तिपत्र माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते खातळे यांना देण्यात आले. परंतु इगतपुरी तालुका हा नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडत असल्यामुळे खातळे यांची कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यास आव्हाड यांचा आक्षेप आहे.खातळे यांच्या नियुक्तीचा अधिकार कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना असून, सध्या प्रदेशाध्यक्ष पदच रिक्त आहे. असे असतानाही पगार यांनी थेट आपल्या अखत्यारित ही नियुक्ती कशी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अशी नियुक्ती करताना नाशिकचे अध्यक्ष आव्हाड यांना डावलण्यात आल्याची भावना आव्हाड समर्थक व्यक्त करीत आहेत.४पगार यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील सततच्या हस्तक्षेपामुळे आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत लवकरच ते पक्षनेते छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.कामगार सेल जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा प्रश्न माझ्या कार्यक्षेत्राशी निगडित असतानाही मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. माझ्या कार्यक्षेत्रात नियुक्ती करण्याचा अधिकार केवळ मला असताना, दुसऱ्यांकडून होणारा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात काम करावे.  - कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष,  नाशिक लोकसभा मतदारसंघ

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणNashikनाशिक