शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:14 IST

जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे. सदरची माहिती शासनाकडे रवाना झालेली असली तरी, तीन तालुक्यांची मंत्र्यांकडून पाहणीच झाली नसल्याने त्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे लवकरच भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्यामुळे व त्यातही तो सलग न पडल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. आॅगस्टच्या अखेरीस काही तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाने खरिपाच्या काही पिकांना जीवदान मिळाले.परंतु अन्य तालुक्यांमध्ये पाऊस न पडल्याने पिकांवर वाईट परिणाम झाला. आॅगस्टनंतर पावसाने दडीच मारल्याने यंदा आॅक्टोबरमध्येच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवू लागले आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन खरीप पिकांचे उत्पादनही घटल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होत असल्याने सरकारने त्याची दखल घेत सर्वच पालकमंत्र्यांना जिल्ह्णांच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता, पीक परिस्थिती या तांत्रिक बाबी तपासण्याच्या सूचना कृषी, महसूल व भूजल विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक या आठ तालुक्यांची शासनाने निवड करून, त्यातील दहा टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची माहिती व त्याचे छायाचित्रे घेऊन ती आॅनलाइन पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण व देवळा या पाच तालुक्यांचा दौरा केला उर्वरित तीन तालुक्यांची पाहणी जलसंधारणमंत्री राम शिंदे करणार आहेत. तत्पूर्वी शासकीय पथकाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये भेटी देऊन आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.जिल्ह्णात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठासिन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने आणखी चार टॅँकर नव्याने मंजूर करण्यात आले असून, एकट्या सिन्नर तालुक्यात १७ तर जिल्ह्णात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणत: २५० गावे, वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ