नाशिक : मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. दुपारनंतर पंचवटी, सिडको, सातपूरसह इतर उपनगरांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले होते. तर वडाळा येथे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चौकांमध्ये पाण्याचे तळे साचले होते.नाशिकरोडला रिमझिमरविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत अधून मधून पावसाची रिमझिम सुरू होती. यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच विजेचा लपंडावदेखील सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून नाशिकरोड परिसरामध्ये अवकाळी पावसाचे आगमन होत असल्याने सर्वांची धांदल उडत असून, मोठी गैरसोय होत आहे.
शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 00:58 IST
मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : सायंकाळी पसरला गारठा