शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:56 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने विजेचे खांब पडल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

ठळक मुद्देउष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने विजेचे खांब पडल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.शनिवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा असल्याने पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे वाहू लागले होते.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे वातावरण दिसत होते. साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह तासाभराहून अधिक काळ पावसाने हजेरी लावली. दिवसभर असलेल्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला. तसेच या पावसामुळे आगामी खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे. दापूर, सोनेवाडी, चापडगाव व धुळवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस या भागात पडला. तसेच दापूर परिसरात विजांच्या तारांवर झाड पडल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सोनेवाडी येथे विजेचे चार पोल पडल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. भोजापूर खोऱ्यात मात्र दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. चास, नळवाडी, कासारवाडी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. 

टॅग्स :Rainपाऊसtalukaतालुका