शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:10 IST

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, पेठसह काही भागांत सोमवारी (दि.७) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंबासन येथे वीज कोसळून बैल ठार झाला.

ठळक मुद्देबैलावर वीज कोसळल्याने बैल जागीच ठार

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, पेठसह काही भागांत सोमवारी (दि.७) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंबासन येथे वीज कोसळून बैल ठार झाला.नामपूरला वीज पुरवठा खंडितनामपूर : बागलान तालुक्यातील १६ गाव काटवन परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे नामपूर व टेंबे सब स्टेशनवरील वीज पुरवठा काही तास खंडित करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांची या अवकाळी पावसामुळे तारांबळ उडाली. यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नामपूरसह अंबासन, काकडगाव, बिजोरसे, इजमाने, खालचे टेंभे, वरचे टेंबे, द्याने, उत्राने, कुपखेडा आदी भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंबासन येथे वाघखोर शिवारातील शेतकरी त्र्यंबक कोंडाजी कोर यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाला.लखमापूरला पाऊसलखमापूर : परिसरात अगोदर जोरदार वारे वाहून नंतर पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सोंगणीला आलेला गहू जोराच्या वाऱ्याने आडवा पडल्याने बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे सोंगणीला मोठ्या प्रमाणावर आडकाठी येण्याची शक्यता आहे. द्राक्षे काढणी सुरू असताना अचानक वातावरण बदलल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. लखमापूर, दिंडोरी, करंजवण, अक्राळे, तळेगाव, परमोरी, दहेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.मनमाडला कांदा पोळी भिजल्यामनमाड : हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाची एकच धावपळ उडाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली होती; परंतु रात्री पाऊस आल्याने एकच धावपळ उडाली. काही शेतकऱ्यांच्या मका व कांदे काढून शेतात असलेल्या कांदा पोळी भिजल्या.

टॅग्स :Rainपाऊसtalukaतालुका