शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती : संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:13 IST

टाळकरी यांनी परस्परांमध्ये अंतर राखत गोसावी महाराजांना साथ केली. यावेळी बहुतांश वारकरी, टाळकरींनी तोंडावर उपरणे व मास्कदेखील बांधल्याचे दिसून आले.

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदीरात त्यांचा ७२४वा संजीवन समाधी सोहळा अवघ्या तीस ते चाळीस भक्तांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.१८) पार पडला. यावेळी देवस्थानचे पारंपरिक पुजक गोसावी बंधू सर्व विश्वस्त मंडळ व मानकरी यांच्यासह मोजकेच वारकरी भाविक सोहळ्याला उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी मंदीर आहे. दरवर्षी संजीवन समाधी सोहळा मोठ्या थाटात व भक्तीभावात साजरा केला जातो. यावेळी वारकरी भाविकांची मांदियाळी बघावयास मिळते. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिराच्या परिसरात असते; मात्र कोरोना आजाराचे यंदा आलेल्या संकटामुळे हा सोहळादेखील जास्त गर्दी न करता आटोपता घ्यावा लागला. त्र्यंबकेश्वर येथील इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. संजीवन समाधी सोहळा या कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच थांबविण्याची वेळ ओढावल्याचे देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, मंदिरात मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत किर्तन सोहळा देवस्थानचे विश्वस्त पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी संपन्न केला. यावेळी त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी टाळकरी यांनी परस्परांमध्ये अंतर राखत गोसावी महाराजांना साथ केली. यावेळी बहुतांश वारकरी, टाळकरींनी तोंडावर उपरणे व मास्कदेखील बांधल्याचे दिसून आले. सुदैवाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नाही; मात्र कोरोनाला निमंत्रण मिळू नये, यासाठी त्र्यंबकनगरी अधिकाधिक सतर्क राहून खबरदारी घेताना दिसत आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक