शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

देवळ्याचा पूर्वभाग दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: July 5, 2014 00:26 IST

देवळ्याचा पूर्वभाग दुष्काळाच्या छायेत

मेशी : जून महिना संपला तरीदेखील देवळा तालुक्यात मान्सूनचा पाऊस नाही. मृग नक्षत्रापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे.देवळा तालुक्याचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. गारपिटीमुळे या भागातील कांद्याचे बियाणे (उळे) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी जळगाव, जालना जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील दक्षिण भागातून मिळेल त्या किमतीला बियाणे खरेदी केले आहे. १० ते १२ हजार रुपये पायलीप्रमाणे बियाणे खरेदी केले; परंतु पाऊस नसल्याने ते बियाणे शेतात टाकण्याऐवजी अजूनपर्यंत घरातच पडली आहेत. पाऊस लांबत असल्याने कांदा पीक घेण्याचे नियोजन समीकरण युक्त असताना बियाणे खराब होऊ लागली आहेत. पाऊस किती दिवस लांबतो याचीच चिंता सगळ्यांना भेडसावत आहे.दहा-बारा वर्षांपूर्वी पाऊस पडत नसल्यास ग्रामीण भागातील असंख्य तरुण शेतकरी रात्रीच्या वेळेस ‘धोंडी-धोंडी पाणी दे’ असे गाणी म्हणत. वरुणराजाला आळवणी घालत असत. मात्र, ही प्रथा आता कालबाह्य झाली आहे. पूर्वी डोक्यावर लिंबाचे पानांचा टोप, कमरेला घुंगरू, पायात घुंगरू असा पेहराव करून दहा ते बारा उत्साही तरुण विशिष्ट वाद्याच्या चालीवर गाणे म्हणत पाणी मागत असत. महिलावर्ग त्या धोंड्याला डोक्यावर पाणी टाकून ओल करीत असत; परंतु ती प्रथाही आता उरलेली नाही याची खंत जुन्या वयस्करांना आहे. कारण आता ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी शेतवस्तीवर राहू लागल्याने एकत्र जमाव जमणे दुरापास्त झाले आहे. पूर्वी ग्रामस्थ गावातच राहत असत.एवढे मात्र नक्की निसर्गाबरोबर जुन्या पारंपरिक पद्धतींनी आता डोके वर काढणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. पाऊसच नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. (वार्ताहर)