शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 15:35 IST

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी (दि.२) लासलगाव बाजार समिती आवारात बाजारभाव ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रुपये राहिले. तर पिंपळगावी प्रतिक्विंटल २५०० रुपये भाव जाहीर झाला होता. दरम्यान, कांदा भावात हळूहळू तेजी येत असतांनाच आता बांगलादेश सरकारने बुधवार दि.२ जून पासून कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे.लासलगांव येथे बुधवारी दिवसभरात १८ हजार ३०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रूपये बाजारभाव राहिला. मंगळवारी (दि.१) दिवसभरात २५ हजार ९०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ६०० ते २१५२ व सरासरी १८०० रूपये भाव राहिला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार २०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ६००, कमाल २०२१ तर सर्वसाधारण १५७६रुपये प्रती क्विंटल होते. दरम्यान,जिल्ह्यातील दिंडोरी व वणी बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक होत असुन खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाला यंदा कांदा आधार देणार, असे चित्र दिसत आहे. दिंडोरी व वणी बाजार समितीत मे महिन्यात जवळपास ८० हजार ३६७ क्किंटल कांद्याची आवक झाली. तर बाजारभाव साधारणपणे७७८ ते २१७२ रूपये व सरासरी १४५० रूपये इतके राहिले. यापुढेही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.------------पिंपळगावी २५०० रूपये भावपिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारातही कांद्याची ९९८ वाहनांतून चांगली आवक होऊन बाजारभाव किमान १००० ते कमाल २५०० रुपये आणि सरासरी १७५१ रुपये राहिले. गोल्टी कांद्याला ४०० ते १५०० रूपये व सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला किमान १९९० व कमाल २१९० तर सरासरी २०८० रुपये भाव मिळाला.------------------निर्यातीसाठी अर्ज मागवलेबांगलादेश सरकारने कांदा आयातीकरीता निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. पश्‍चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉक डाउन असतानाही देशातुन एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ हजार मे. टन इतकी निर्यात झाली असून कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रूपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोना काळात चांगलेच चलन परकीय मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक