त्र्यंबकेश्वर : येथे गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि. २२) सुरू होत आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील महालक्ष्मी राइस मिलजवळील रेणुका हॉल येथे होईल. हा सोहळा १२ दिवस सुरू राहणार असून, दि. ४ मार्च रोजी समारोप होणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वेदवाणीचा बारा हजार वाचकांसह जयघोष येथे होणार आहे.या सोहळ्यात दररोज काकड आरती, श्रीविष्णुसहस्रनाम व श्री महिम्नस्तोत्र पठण, मंगलाचरण, गाथा पारायण, कीर्तनसेवा, हरिपाठ, प्रवचन, सांप्रदायिक भजन जागर होईल. या गाथा पारायण व हरिनाम द्वादशाह महोत्सवात दररोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ गुरुवर्य त्र्यंबकबाबा भगत, सिन्नर, निवृत्तिनाथ महाराज अभिषेक, ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे, गंगापूजन (कुशावर्त) गुरु वर्य महंत रघुनाथ महाराज देवबाप्पा फरशीवाले बाबा, गोवत्स पूजा नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नर्मध्वज पूजन गोरक्षनाथ मठाचे अध्यक्ष गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वरला पारायण सोहळ्यासाठी सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:23 IST