शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणे मंदिरात दत्त जयंतीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:06 IST

कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रतिगाणगापूर म्हणून राज्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच दर्शनाला मुभा दिली जाणार असल्याची माहिती दत्त मंदिर संस्थानने दिली आहे.

ठळक मुद्दे प्रतिगाणगापूर : कोरोनाची खबरदारी घेत भाविकांना दिला जाणार प्रवेश

मौजे सुकेणे येथे एकमुखी दत्त मंदिर असून महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी या मंदिरात हजारो भाविक दत्तदर्शन घेतात. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांच्या संख्येवर निर्बंध आले असून दत्त मंदिर संस्थानने कोरोनाविषयक संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीनुसार खबरदारी घेतली जात आहे. मंदिरात भाविकांना मास्क सक्तीचा करण्यात आला असून मंदिर परिसर, गाभारा, सभामंडपाचे निर्जंतुकीकरण, जंतुनाशक फवारणी, हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंगसाठी मंदिरात एकाचवेळी एक असा प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संस्थानचे महंत सुकेणेकरबाबा यांनी दिली. मंदिरात दत्तजयंती पर्वकाळाची तयारी पूर्ण झाली असून भाविकांना विनामास्क प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पूज्य महंत सुकेणेकरबाबा, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर, पूज्य गोपीराजशास्त्री सुकेणेकर व पूज्य राजधरराज सुकेणेकर यांनी दिली.मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर सुमारे ८०० वर्षे पुरातन आहे. याठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे चरणांकित स्थान असून महानुभाव पंथीयांचे आद्य तीर्थस्थळ आहे. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गाने ओझरमार्गे अवघे २७ किलोमीटर, तर औरंगाबाद राज्यमार्गाने चांदोरी किंवा पिंपळस येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर बाणगंगेच्या दक्षिण तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात पूर्वाभिमुख उंच अशा गढीवर हे मंदिर आहे. मंदिराला दगडी बांधकाम असलेले पूर्व महाप्रवेशद्वार आहे. मंदिरातील पुरातन पेशवेकालीन लाकडी कोरीवकाम भाविक व पर्यटकांचे आकर्षण असून या मंदिरात शेकडो वर्षांपासून त्रिकाळ आरती, स्थानास दररोज पहाटे चंदन उटी दिली जाते.मंदिरात व परिसरात भाविकांना मास्क सक्तीचा आहे. गाभाऱ्यात एकावेळी एक भाविकास प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या नियमावलीचे पालन केले जाणार असून गर्दी होणार नाही, याची काळजी संस्थान घेत आहे.- महंत सुकेणेकर, दत्त मंदिर संस्थान

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक