बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:35 PM2020-02-08T22:35:32+5:302020-02-09T00:29:03+5:30

भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली.

Preparation of Brahmotsav at Balaji Temple | बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाची तयारी

बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाची तयारी

Next

लासलगाव : येथील भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. दि. १५ फेब्रुवारी मालेगावचे पंडित कैलास महाराज दायमा यांच्या पौरोहित्याखाली गरूड ध्वजारोहण, श्रीरामधून, श्री हनुमानचालिसा पाठ, आरती व प्रसाद सकाळी १० वाजता गुरुमहिमा या विषयावर शालेय विद्यार्थी यांच्याकरिता निबंध स्पर्धा व गोविंद बाल संस्कार अंतर्गत गुरुआशिष कार्यक्र म होणार आहेत. दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता नवकलश अभिषेक, आरती व प्रसाद दुपारी तीन वाजता. गुरुजनांचा आदरभाव समर्पित शोभायात्रा लक्ष्मी मंदिरापासून निघणार आहे. सेवानिवृत्त शिक्षक सुशीला रघुनाथ आंबेकर यांना गोविंद प्रसाद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परमपूज्य स्वामीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. शोभायात्रेत गोविंदसेवक दत्तात्रेय भांबारे यांनी तयार केलेले विविध चित्ररथ, त्र्यंबक बाबा भगत, साखरे महाराज तसेच विंचूर बॅँडपथक, महावीर जैन वसतिगृह अधीक्षक डी. एफ. कोल्हापुरे, महावीर विद्यालयाचे प्रभाकर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लेजीम पथके सहभागी होणार आहेत.

Web Title: Preparation of Brahmotsav at Balaji Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.