शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:07 IST

सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे.

ठळक मुद्देमंडळाकडून मूर्तींना मागणी नाही : कारखानदारांचे आर्थिक नियोजन कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कसवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ तीस टक्केच गणेशमूर्र्ती कला केंद्रात तयार केल्या असल्या तरी केवळ घरगुती वापराच्या गणेशमूर्तीच बुक होत असून, तीन ते चार फुटांच्या मूर्तींना अद्यापही मागणी नाही. तालुक्यातील आदिवासी भागाचे मुख्य केंद्र म्हणून घोटी, टाकेद बाजारपेठेची ओळख आहे. घोटी येथील पेंटर गणेशमूर्ती कलाकार अनिल रसाळ व टाकेद येथील गणेशमूर्ती व्यावसायिक जाधव बंधूंनी पारंपरिक व्यवसायांना फाटा देत मागील दहा पंधरा वर्षांपूर्वी गणेशमूर्ती बनविण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला.आकर्षक मूर्ती बनविल्या जात असल्याकारणाने तालुक्यातील विविध गावात त्यांच्या मूर्तींना चांगली मागणी वाढत चालली होती. या दोन्ही ठिकाणी छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या साडेसात फूट उंचीच्या सुमारे एक ते दीड हजार मूर्र्ती याठिकाणी रंगरंगोटी करून डिझायनिंग करून बनविल्या जात होत्या. एरवी आतापर्यंत परिसरातील सार्वजनिक मंडळे गणेशमूर्तीचाी बुकिंग करण्यासाठी अगोदरच गर्दी करत असत मात्र यावर्षी बोटावर मोजता येण्या सारख्या मूर्तींची बुकिंग आतापर्यंत झाली असल्याचे दिसून येत आहे.गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून आमचे कुटुंब मातीचे व प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे बैल, गणेशमूर्ती, नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती, दीपावलीत लक्ष्मीच्या मूर्ती बनवत असतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लहान-मोठ्या मूर्ती बनवून मूर्तींना उत्कृष्ट डेकोरेशन, रंगरंगोटी, डिझायनिंग करून तयार करत असतो. त्याचा कुटुंबास मोठा हातभार लागत असतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालूवर्षी मूर्तींची मागणी घटली आहे.- अनिल रसाळ, पेंटर, मूर्तिकार, घोटीदरवर्र्षी गणेशोत्सवात परिसरातील गणेश मंडळ एक महिना अगोदरच गणेशमूर्र्ती बुक करून ठेवतात. परंतु यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने गणपती उत्सव तोंडावर आलेला असतानाही गणेशमूर्तींना मागणी नाही. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली असल्याने अद्याप बोटावर मोजण्याइतक्याच मूर्र्ती बुक झालेल्या आहेत.- नंदू जाधव, गणेशमूर्ती व्यावसायिक, टाकेद

टॅग्स :ganpatiगणपतीTempleमंदिर