शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

उपउपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्यांचीच बाजी

By admin | Updated: July 2, 2014 00:18 IST

उपउपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्यांचीच बाजी

उपउपांत्यपूर्व फेरीआफ्रिका खंडाचे आव्हान असणाऱ्या नायजेरिया आणि अल्जेरिया संघाचे गोली व्हीसेंट ऐनेमा आणि रईस एमबोल्ही यांच्या अप्रतीम बचावानंतरही फ्रान्स आणि जर्मनी या माजी विश्वविजेत्या युरोपीय संघानीच बाजी मारली.या २०व्या विश्वचषकाच्या बादफेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यातील पाच आणि सहा हे सामने काल पार पडले. या दोन्हीही सामन्यांमध्ये युरोपविरुद्ध आफ्रिका या दोन खंडांतील संघांचा आमना-सामना झाला. आफ्रिकन संघाचा विचार केल्यास आत्तापर्यंतच्या १९ विश्वचषकांमध्ये आफ्रिकन संघांची कामगिरी डोळ्यात भरण्याइतकी राहिलेली नाही आणि पहिल्या १६मध्ये एखाद्या संघाला स्थान मिळवता आलेले नाही. कधी कॅमेरून, तर कधी घाना, कधी सेनेगेल तर कधी नायजेरिया अशा संघानी आफ्रिका खंडाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विश्वचषकामध्ये सहभागी झालेल्या आफ्रिकेच्या कॅमेरून, आयव्हरी कोस्टा, घाना, नायजेरिया आणि अल्जेरिया या पाचही संघांनी चांगली कामगिरी केलेली दिसून येते. कॅमेरूनला आपल्या गटात एकही गुण मिळाला नाही, परंतु त्यांनी ब्राझीलशी केलेला संघर्ष दखल घेण्याइतका नक्कीच आहे. आयव्हरी कोस्टाचे तर बॅडलक म्हणावे लागेल. या संघाने अखेरच्या शेवटच्या साखळी सामन्यात ग्रीसविरुद्ध अगदी सामना संपण्याच्या वेळी गोल अंगावर घेतला, नाहीतर आयव्हरी कोस्टालाही पहिल्या १६मध्ये स्थान मिळाले असते. त्याचप्रमाणे जर्मनी, पोर्तुगाल, अमेरिका यांच्याबरोबर ग्रुप आॅफ डेथच्या गटात अडकलेल्या घानाचाही खेळ शेवटी शेवटी ढासळला. तरीही जर्मनीशी बरोबरीचा खेळ बघता हा संघ दुसऱ्या गटात असता तर नक्कीच १६मध्ये दाखल झाला असता. यावेळी आफ्रिकेच्या दोन संघांनी प्रथमच नायजेरिया आणि अल्जेरियाच्या रूपाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या दोघांचीही गाठ उपउपांत्यपूर्व फेरीत अत्यंत अनुभवी माजी विश्वविजेत्या फ्रान्स आणि जर्मनीशी पडली. फ्रान्सने १४ वेळा, तर जर्मनीने १७ वेळेस विश्वचषकात शिकस्त केलेली आहे. या तुलनेत त्यांच्यासमोर असणारे नायजेरिया आणि अल्जेरिया या दोघांनाही केवळ ४ विश्वचषकांचा अनुभव होता. मात्र या दोन्हीही संघांतील खेळाडूंनी जी जिद्द दाखविली त्यावरून आता येथून पुढील येणाऱ्या काळात कोणालाही ही लढाई सोपी नाही याचा प्रत्यय नक्कीच आला. नायजेरियाच्या संघर्षाला पोग्बाचा छेद : नायजेरिया-फ्रान्स या सामन्यात नायजेरियाने फ्रान्सच्या तोडीस तोड खेळ केला. पहिल्या १५-२० मिनिटांत तर नायजेरियाचेच खेळावर वर्चस्व होते. फ्रान्सचे करीम बेंझीमा, पॉल पोग्बा, व्हेरा, मॅथ्यू व्हेलबुंना, आॅलीव्हर गाउड यांच्या हल्ल्यांना नायजेरियाचे अहमद मुसा, मिकेल, अ‍ॅब्रोस, बोंगी यांनीही प्रतीहल्ले करून फ्रान्सला सडेतोड उत्तर दिले, तर बचावात गोली व्हिंसेंट ऐनेमा याने फ्रान्सच्या हल्ल्यांना चांगल्याप्रकारे थोपवत फ्रान्सवरच दबाव आणला. परिणामी पूर्वार्धात बरोबरीचीच राहिली. उत्तरार्धातही अर्ध्या तासापर्यंत नायजेरियाच्या खेळाडूंनी वेगळे काही घडू दिले नाही. मात्र ७९ व्या मिनिटाला गोली व्हिंसेंटच्या बचावानंतर आलेला रिबाउंडमुळे गोलसमोर मिळालेल्या चेंडूला फ्रान्सचा उंचपुऱ्या पोग्बाने हेडरने जाळीत पाठवण्याची किमया साधली आणि कोंडी फोडली. गोल झाल्यामुळे इतका वेळ संयमाने आणि आपला नैसर्गिक खेळ करणाऱ्या नायजेरियाच्या खेळाडूंचा संय्यम थोडासा ढळला आणि त्यांच्याकडून वारंवार चुका होऊ लागल्या आणि सामना संपण्याच्या एक मिनिट आधी गडबडीत त्यांचा कर्णधार योबोकडूनच सेल्फ गोल झाल्यामुळे फ्रान्सची आघाडीची दुप्पट झाली आणि आफ्रिकन सुपर इगल्सची झेपही थंडावली.जर्मनी-अल्जेरिया पुन्हा संघर्ष शिगेला : नायजेरियाच्या पराभवानंतर आफ्रिकेच्या उरलेल्या एकमेव आव्हानाकडे सर्वाच्या नजरा एकवटल्या होत्या. अल्जेरियाची लढत तीन वेळा विश्वविजेत्याशी होती. परंतु या दोन संघांदरम्यान या आधी झालेल्या दोन्हीही सामन्यात अल्जेरियाने या विश्वविजेत्यावर मात केल्याचा इतिहास अल्जेरियाच्या बाजूने होता. तसेच या सामन्याला १९८२च्या विश्वचषकाची किनारही होती. १९८२च्या विश्वचषकात अल्जेरियाने गटात जर्मनवर २-० अशी मात केली होती आणि त्याआधारे अल्जेरिया आणि आॅस्ट्रीयाचा पुढे जाण्याचा मार्ग तयार झालेला होता. मात्र गटातच पराभुत व्हावे लागेल याची कल्पनाच सहन न झाल्यामुळे जर्मनीने आपल्या अखेरच्या सामन्यात आॅस्ट्रीयाशी संगनमत करून या सामन्यात १-० असा ठरवून विजय आपल्या नावावर केला आणि तिघांचेही ४-४-४ असे समसमान गुण झाले असतानाही सरस गोलच्या आधारे जर्मनी आणि आॅस्ट्रीयाने पुढे प्रवेश केला आणि ठरवून अल्जेरियाचा मार्ग बंद केला. ही कधी न विसरणारी घटना असल्यामुळे कालच्या सामन्यातही या घटनेला आणखी उजाळाच मिळाला. काही अल्जेरियन समर्थकांनी १९८२चा उल्लेख असलेले टी शर्टस घालून या घटनेचा निषेध नोंदविला. या सामन्यातही अल्जेरियाच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे खेळ केला ते बघता या घटनेला उत्तर म्हणून अल्जेरिया विजयाने याला उत्तर देते की काय असेच वाटत होते. कारण या विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असणाऱ्या या फिलीप लॅमच्या संघामध्ये थॉमस मुल्लर, मेसुट ओझेल, स्वानस्टायगर, मॅटेसॅकर, लुकास पोडस्की अशा एकापेक्षा एक खेळाडूंची फौज असूनही अल्जेरियाच्या जिद्दी बचावपटुंनी आणि विशेषत: त्यांचा गोली रईस एमबोल्ही याने या सर्वांचेच थेट मारलेले जोरदार शॉटस अडवताना आपल्या पूर्वानुमानाच्या कौशल्याचा आधारे यशस्वीपणे वारंवार थोपवले. तर आपल्या मैदानातून मारलेले लांब उंचावरून आलेल्या चेंडूचा अचुक अंदाज घेत इस्लाम स्लिमानी आणि इल अरबी सोदीनी यांनी जर्मनीचे बचावपटू मॅटेसॅकर, फिलीप लॅम तसेच गोली मॅन्युअल नेयुर यांचीही चांगलीच परीक्षा पाहिली. निर्धारीत ९० मिनिटांच्या खेळात ०-० ही बरोबरी जर्मनीच्या दर्जाला शोभेशी नव्हती, तर अल्जेरियाचा दर्जा सिद्ध करणारी अशीच होती. त्यामुळे अतिरिक्त १५-१५ मिनिटांत गेलेल्या या सामन्याला सुरवात झाली आणि आता काही पर्यायच नाही हे बघता जर्मनच्या भरवशाचा खेळाडू आणि घानाविरुद्ध शेवटी मैदानात उतरून लगेचच गोल करून बरोबरी साधणाऱ्या मिलोस्लाव क्लोसही हात झटकून मैदानात उतरण्याची तयारी करत होता. परंतु अतिरिक्त वेळेच्या पहिल्या सत्रातील दुसऱ्याच मिनिटाला जर्मनच्या एकत्रित चालीला यश आले आणि थामस मुल्लरने डावीकडून हलक्याशा केलेल्या क्रॉस चेंडूला आपल्या उजव्या पायाच्या मागून डाव्या पायाने स्कुलरीने मारल्यामुळे त्याचा अंदाज गोली रईस एमबोल्ही याला आला नाही आणि हा डेडलॉक सुटला. जर्मनीला यामुळे मिळालेल्या आघाडी बरोबरीत रूपांतरीत करण्याचे चांगले प्रयत्न अल्जेरियाकडून झाले मात्र इतका वेळ मैदानात संघर्ष केल्याचा थकवाही त्याच्या हालचालीवरून जाणवत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळात मेसुट ओझेलने दोन मिनिटे बाकी असताना डावीकडून कुच करत जर्मनीचा दुसरा गोल करत सामन्याचा निकालच जाहीर केला. तरीही जिद्दी अल्जेरियाच्या खेळाडूंनी जाताजाता एक गोल करत या लढतीद्वारे आपली आणि आफ्रिकनांचाही सन्मान वाढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त माजी विश्वविजेत्यांचीच बाजी