शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:02 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचणीत असतानाही उधारी, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पावसाच्या ओढीने शेतकामांना प्रारंभ केला आहे.८ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. मान्सूनचे आगमन केरळमध्ये झाले शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी जमीन नांगरून ठेवली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महागडी खते वापरण्याऐवजी शेणखतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग करत असल्याचे दिसून येत आहे. यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील पिकातून एक रुपयादेखील उत्पादन निघालेले नसून झालेला खर्चसुद्धा वसूल झालेला नाही. ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य शेतकरी वर्गाने गतवर्षी हवामान खात्याने वर्तविलेल्या पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार महागडी दराने बी-बियाणे, रासायनिक खते उधारित का होईना खरेदी करून मका, सोयाबीन, बाजरीसारखी पिके घेतली होती; परंतु यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गाला पिकातून उत्पादनाऐवजी हातात करपलेल्या झाडांशिवाय काहीच बघायला मिळालेले नाही. आधीच या पिकांची कृषी दुकानदारांची देणी बाकी असून, ती फिटलेली नसताना पुढील नव्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी वर्गाला भांडवलाची मोठी चिंता उभी राहिली आहे. त्यातूनही काहींनी मार्ग काढत उधारी, उसनवार व कर्ज काढून आगामी हंगामाची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोडधंदा उपलब्ध नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे.नांदूरशिंगोटे येथे व परिसरात प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती