शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला अन्नपूर्णामातेची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:55 IST

येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले.

ठळक मुद्देमाझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब ; सुमित्रा महाजन तीन महात्मा एकाच व्यासपीठावर त्र्यंबक क्षेत्र परिपूर्ण असून, या मंदिरामुळे शहराचा अधिकच नावलौकिक वाढेल

त्र्यंबकेश्वर : येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले.  त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णामातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बुधवारी त्या आल्या होत्या. त्याप्रसंगी महाजन बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महामंडलेश्वर १००८ स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, खासदार हेमंत गोडसे, स्वागतध्यक्ष दिनेश मित्तल, कैलास घुले, आमदार सीमा हिरे, महायज्ञ समितीचे उपाध्यक्ष वरजिन्दर सिंह छाबडा, पवन सिंघानिया आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाल्या, आज खरोखरच भाग्याचा दिवस असून, तीन महात्मा एकाच व्यासपीठावर आहेत. येथे उपस्थित स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, स्वामी आशुतोषगिरी, हृदयानंदगिरी या तिघांना खरे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशीच उपाधी द्यायला हवी. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे आयोजक सातत्याने मला फोन करून ‘त्र्यंबक आना है’ असे सांगत होते आणि मलाही प्रश्न पडला होता की या कार्यक्रमाची तारीख काय असेल, अखेर हा योग आज जुळून आला.  इंदूरच्या नागरिकांना जसा माता अहिल्याचा आशीर्वाद आहे तसाच आशीर्वाद अन्नपूर्णा देवीचा आहे. एका श्रेष्ठ भारताची कल्पना केली असता आपण बरेच पुढे गेलो आहोत, अध्यात्मिक क्षेत्रात भारताने पुढे पाऊल ठेवले असून, आता या मंदिरामुळे त्र्यंबकची शोभा अधिकच वाढेल असे सांगत महाजन म्हणाल्या की, सद्यपरिस्थितीमध्ये त्र्यंबक क्षेत्र परिपूर्ण असून, या मंदिरामुळे शहराचा अधिकच नावलौकिक वाढेल असे त्या शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमासाठी त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, दिनकर आढाव, प्रदीप बूब, महायज्ञ समितीचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, महामंत्री प्रदीप पटेल, मंत्री सुनील गुप्ता, विलास ठाकूर, शिर्डीच्या सुनंदा बाळासाहेब जाधव, कोषाध्यक्ष रतिश दशपुत्रे, प्रमुख संयोजक श्यामकुमार सिंघल, स्वामी वामदेवतीर्थ महाराज, जम्मूचे स्वामी हृदयानंद महाराज, इंदूरचे स्वामी जयेन्द्रानंदगिरी, मलेशियाचे सत्यप्रकाशानंद सरस्वती, त्र्यंबकेश्वरचे स्वामी विवेकानंदगिरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्यामकुमार सिंघल यांनी केले, तर आभार किशोर गोएल यांनी मानले. महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी म्हणाले की, कोणाच्या जीवनात दु:ख येता कामा नये. प्रत्येकाच्या जीवनात सुखशांती येणे गरजेचे आहे. स्वामी हरयानंदगिरी आपला अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाला त्र्यंबकनगरीत उपस्थित झाले. याचा मला आनंद वाटतो. त्र्यंबकेश्वर ही पावनभूमी या मंदिरामुळे अधिकच पावन झाल्याचे गौरवोद्गार महाराजांनी शेवटी काढले. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेल्या सुमित्रा महाजन यांचे महाराजांनी विशेष कौतुक केले.  अन्नपूर्णामातेचे संपूर्ण मंदिर संगमरवरात तयार  करणारे अहमदाबाद येथील वास्तुविशारद सत्यप्रकाश  यांचा विशेष गौरव सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या मंदिरासाठी त्यांनी कोणतेही शुल्क न आकारता केवळ  नारळ घेऊन ते संपूर्ण मंदिर तयार केल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.असे झाले कार्यक्रमकार्यक्रमस्थळी सुमित्रा महाजन यांचे ठीक ११.३० वाजता आगमन झाले. त्यानंतर प्रथम त्यांनी लक्षचण्डी यागाला भेट देत मनोभावे पूजा केली. यावेळी पौरोहित्य कल्याण दत्त (इंदूर) आणि लोकेश अकोलकर (त्र्यंबकेश्वर) यांनी केले. या लक्षचण्डी यागासाठी १०० यजमान, ७५० पुरोहित सहभागी झाले आहेत. इंदूरचे श्रवणलाल मोदी यांच्या मातोश्रींच्या प्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अन्नपूर्णामातेच्या मंदिरात विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम प्रधानदेवता पूजन, सप्तशती पाठांचे हवन, वेदांच्या मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी अन्नपूर्णामातेची मूर्ती महाजन यांना प्रदान करण्यात आली.

 

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन