हर्षद कोल्हे
पंचवटी : मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हर्षद अशोक कोल्हे (३१) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हर्षल घरच्या घरी उपचार करणाऱ्या कोरोना रुग्णांना घरपोच मोफत ऑक्सिजन सिलिंडर रिफिल पुरविण्याचे काम करत होता.
(फोटो ०७ कोल्हे)
----------
छगनराव सोळसे
नाशिकरोड : इंडिया सिक्युरिटी प्रेसचे सेवानिवृत्त कर्मचारी छगनराव पांडुरंग सोळसे (७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विनायक सोळसे यांचे ते वडील होत. (फोटो ०७ सोळसे)
--------
चंदर सामानाणी
नाशिकरोड : येथील व्यापारी चंदर गोविंदराम सामनाणी (रा. गंधर्व नगरी, ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. व्यापारी रामशेठ सामनाणी यांचे ते चुलत बंधू होत. (फोटो ०७ चंदर)
-------