शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नामकोच्या निवडणुकीत  बागमार समर्थकांचे ‘प्रगती’ पॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:43 IST

नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित बागमार यांनी विरोध केला

नाशिक : नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित बागमार यांनी विरोध केला असून, त्यामुळे गिते- साने- भंडारी यांच्या पॅनलने प्रगती नाव घेतले आहे. या निवडणुकीत शेलार यांच्या पॅनलसह आता तीन पॅनल रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.१ लाख ८६ हजार सभासद असलेल्या नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेची निवडणूक २३ डिसेंबर रोजी होणार असून, त्यासाठी येत्या १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या (कै.) हुकूमचंद बागमार यांचे नम्रता तर ललित मोदी- गजानन शेलार यांच्या सहकार पॅनलमध्ये आजवर लढत बघायला मिळत होती. चाळीस वर्षांपासून हुकूमचंद बागमार हे नम्रता पॅनल नावाने निवडणूक लढवित होते. त्यांच्या पश्चात मात्र बागमार यांच्या पॅनलमधून निवडणूक लढविताना नम्रता पॅनलचे नाव वापरण्यास अजित बागमार यांनी आक्षेप घेतला आहे. हुकूमचंद बागमार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्याचा अधिकार केवळ हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र म्हणून आपल्यालाच असल्याने कोणालाही नम्रता नाव घेऊ दिले नाही, असे अजित बागमार यांनी सांगितले.सुरुवातीला अजित बागमार यांच्या पॅनलविषयी शंका असताना आता त्यांनी ५७ इच्छुकांची यादी तयार केली आहे. त्यातील २१ उमेदवारांची नावे गुरुवारी (दि.१५) घोषित करण्याची शक्यता असल्याचे बागमार यांनी सांगितले. नाशिक मर्चंट बॅँकेच्या रणांगणात उतरण्यासाठी बहुतांशी माजी संचालक असलेले हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाली काम करणारे माजी आमदार वसंत गिते, विजय साने, सोहनलाल भंडारी आणि हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने त्यामुळे प्रगती पॅनल असे नाव घेतले आहे. या पनलमध्ये बहुतांशी जुनेच संचालक उमेदवार असणार असून, त्यात रजनी जातेगावकर, शोेभा छाजेड, शिवदास डागा, प्रफुल्ल संचेती, भगवान चौधरी यांसह अन्य अनेकांचा समावेश असणार  असल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ तीन ते चार नवीन उमेदवार असतील, असे गिते-साने पॅनलच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक मर्चंट बॅँकेसाठी आता अजित बागमार यांचे नम्रता, गिते-साने-भंडारी यांचे प्रगती तर ललित मोदी-गजानन शेलार यांच्या सहकार पॅनलमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.बागमार कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारीहुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गिते-साने-भंडारी यांच्या पॅनलने बागमार कुटुंबीयांपैकी कोणत्याही एकाला सहभागी करून घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. विशेषत: अजित बागमार यांचे सुपुत्र अ‍ॅड. आनंद बागमार यांना पॅनलमध्ये घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीरिझर्व्ह बॅँकेने पाच वर्षांपूर्वी संचालकांपैकी १२ जणांवर आक्षेप घेतला होता. अशांच्या बरोबर निवडणूक लढविणे हे भविष्यात कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आणणारे आहे. त्यामुळे हुकूमचंद बागमार यांचे नाव वापरणाºयांना पॅनलसाठी नम्रता हे नाव वापरण्यास मी आक्षेप घेतला आहे. नम्रता पॅनलची लढत सहकार पॅनलशीच होईल.- अजित बागमार, नेता, नम्रता पॅनल

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र