शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:03 IST

नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थितीने अनोखी झळाळी लाभणार आहे. 

ठळक मुद्देपुढचे पाऊल : साहित्य संमेलनात प्रथमच रंगणार बालकांचा उत्सव

नाशिक :  नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थितीने अनोखी झळाळी लाभणार आहे. भविष्यातही मराठी टिकावी आणि उद्याच्या नागरिकांमध्येदेखील मराठीच्या साहित्याची ओढ जोपासली जावी, या उद्देशाने नाशिकच्या साहित्य संमेलनापासून प्रथमच संमेलनात बालमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकट्टा व बाल आनंद  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात बाल कविसंमेलन, कथाकथन, बाललेखकांशी संवाद, असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. प्रख्यात अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीचा आनंददेखील बालकांसह रसिकांना मिळू शकणार आहे. संमेलनाला येणाऱ्या रसिकांमध्ये बालकांचादेखील अंतर्भाव व्हावा, त्यातून साहित्य संमेलनाचे हे महाद्वार त्यांच्यासाठीदेखील खुले व्हावे, तसेच बालकांमध्येदेखील बालसाहित्यासह अन्य साहित्याची रुची निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याशिवाय या बालवाचकांमधूनच उद्याचे बाललेखक घडावेत,  असा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘बोक्या सातबंडे’ची यशोगाथाप्रचंड प्रतिभावान, अष्टपैलू आणि प्रयोगशील अभिनेता ही प्रभावळकरांची मुख्य ओळख असली तरी प्रसन्न हास्याचा शिडकावा करणारा प्रतिभावान लेखक हीदेखील त्यांची दुसरी ओळख आहे, तसेच खुदकन हसवता-हसवता अंतर्मुख करणारे लिखाण करतानाच ‘बोक्या सातबंडे’सारखा गमतीशीर, खट्याळ बालनायक रंगवतानच बालकांच्या मनात संस्कारांची पेरणी करणारे लेखक म्हणूनदेखील प्रभावळकर सर्वज्ञात आहेत. या बोक्या सातबंडेच्या बालकथांना प्रचंड प्रतिसाद लाभल्याने त्याचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. वा पुस्तक मालिकेला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारदेखील लाभला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकDilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर cultureसांस्कृतिक