नाशिक:४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्र ीडा मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८-१९ चे यजमानपद महानिर्मिती कंपनीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्रास मिळाले आहे. सदर स्पर्धा२० ते २२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान, एकलहरेतील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, शक्तिमान क्र ीडासंकुलात होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतातून २० पेक्षा अधिक संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेनिमित्त तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचे पूजन नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते झाले.सदर स्पर्धेसाठी मुख्य आयोजन उमाकांत निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ शिंदे , आनंद भिंताडे,अनिल मुसळे,आदी करीत आहेत.तरी या स्पर्धांसाठी खेळाडू व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उमाकांत निखारे यांनी केले आहे.
शक्तिमान क्र ीडासंकुलात व्हॉलिबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:44 IST