शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 02:32 IST

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील  घरगुती, औद्योगिक,  वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून,  आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी  थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवत या मार्च महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.    

ठळक मुद्दे ७७८ कोटींची थकबाकी; महावितरणची मोहीम

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडलातील  घरगुती, औद्योगिक,  वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असून,  आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी  थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवत या मार्च महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.       थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वा ईमेलवर वीजपुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्जोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.फेब्रुवारी महिन्यातसुद्धा नाशिक आणि मालेगाव मंडळात ८ हजार ९४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाइलवर मीटर रीडिंग वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात; पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात  वसुली मोहीम तीव्र करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज