इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:50 PM2021-07-22T22:50:38+5:302021-07-23T00:53:36+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे.

Power supply cut off for four days in eastern part of Igatpuri | इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित ; विजे अभावी विस्कळीत जनजीवन अंधारात

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे.
दरम्यान चार दिवसांपासून पूर्व भागातील टाकेद, खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, अडसरे, मायदरा-धानोशी, सोनोशी, बारशिगवे, वासाळी, इंदोरे, खडकेड, अधरवड, टाकेद खुर्द, अडसरे खुर्द आदी ग्रामपंचायतीसह जवळपास चाळीस वाड्या-वस्त्या ह्या गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत.

वीजे अभावी ग्रामपंचायत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा बंद असल्याने अनेक कुटुंबांना अन‌् पावसाळ्यात पिण्याचे मिळत नाही, तसेच सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया चालू आहेत, शालेय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी,कार्यालय, सेतू कार्यालय, आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालयात विविध कामकाजासाठी दाखले कागदपत्रे यांची गरज आहे. परंतु लाईट अभावी कोणतेच काम होत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्ग त्रस्त झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या सीइटी परीक्षा, ऑनलाइन शिक्षण,ऑनलाइन परीक्षा सध्या चालू असून लाईट नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चार दिवसांपासून वीज नसल्याने घर घंटी, आटा चक्की, पीठ गिरणी बंद आहे, यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. डीबरीसाठी घासलेट, रॉकेल मिळत नसल्याने अनेक कुटुंब गोडेतेलाचा पणतीचा वापर करत आहेत.

अनेकांचे मोबाईल बॅटरी, इन्व्हर्टर संपल्याने पूर्व भागात संपर्क होत नाही गेल्या चार दिवसांपासून पूर्व भागात वीज पुरवठा बंद असल्याने सर्वत्र नागरिक भर पावसाळ्यात अंधारात आपले जीवन जगत आहे. अनेकदा स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, पोलीस पाटील वीज वितरणाच्या कर्मचारी वायरमनला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कोणीही कर्मचारी संपर्कात येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
दरम्यान चार दिवसांपासून लाईट नसल्याने इलेक्ट्रॉनिक सुख सुविधांपासून सर्व परिसर वंचित आहे. कागदपत्रे ऑनलाइन कामकाजसाठी विद्यार्थी ,शेतकरी बांधव पीक विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित आहे तरी चार दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्ती करून वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत चालू करण्यात यावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पूर्व भागातील टाकेद-खेड परिसरात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा भरण्यासाठी २३ तारीख शेवटची असल्याने चार दिवस विजेअभावी व्यर्थ गेले आहेत तरी संबंधित वीज वितरण विभागाने लक्ष्य घालून लवकरात लवकर वीज पुरवठा चालू करण्यात यावा."
- दिलीप बांबळे, सीएससी केंद्रचालक टाकेद बु.

सध्या ऑनलाइन परीक्षा चालू आहे.अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईलच चार्ज नसल्यामुळे बंद आहे यामुळे ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून हे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान आहे.
- पूजा पाबळकर, विद्यार्थिनी.


खेड परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात असल्यामुळे लाईट अभावी घरघंटी, आटा चक्की, पीठ गिरणी बंद असल्यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा,महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालये, बँक यासोबतच तलाठी कार्यालय सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज लाईटवर अवलंबून आहे. संबंधित विभागाने तात्काळ वीज पुरवठा चालू करावा अशी मागणी होत आहे.
- सागर वाजे, ग्रामस्थ खेड, परदेशवाडी.

Web Title: Power supply cut off for four days in eastern part of Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.