शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकात आत्मविश्वास देण्याचे सामर्थ :किशोर कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:22 IST

पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.

ठळक मुद्देसमग्र कुसुमाग्रज’मधून साहित्य आठवणींना उजाळा

नाशिक : पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्र माच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित ‘वाचनाने घडवू जीवन’ या कार्यक्र मात मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी कदम यांनी माझ्यातील अभिनेता आणि कवी पुस्तकांच्या मैत्रीमुळे कसा विकसित झाला त्याचे अनुभव सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जीवन जगण्याची कला वाचनासह विचारातूनच सुरू होत असल्याचे नमूद केले. आपल्या देशासाठी काही भव्यदिव्य करण्याचे ध्येय घेऊन उत्तुंग शिखराकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मिळतील तेवढी पुस्तके वाचणे आणि सभोवतालच्या माणसांचे अंतरंग समजून घेणे यातूनच खरे विश्व उलगडते, असे सांगितले. त्यांच्याशी सचिन उषा विलास जोशी यांनी संवाद साधला. पाहुण्यांचे स्वागत विनायक रानडे आणि विश्वास ठाकूर यांनी केले.कवी प्रकाश होळकर यांनी प्रास्ताविक, तर वास्तुविशारद संजय पाटील यांनी आभार मानले. त्याशिवाय बाल साहित्य संमेलनदेखील रंगले.उच्च साहित्यमूल्याला वास्तवाचे भानकुसुमाग्रज हे साहित्यातले दैवत होते. त्यांच्या लेखनातून समृद्ध झाले आणि जीवनाला ऊर्जा मिळाली. कुसुमाग्रजांचे साहित्य हे उच्च साहित्यमूल्य असलेले आणि वास्तवाचे भान असलेले होते, प्रतिपादन अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी केले. ‘समग्र कुसुमाग्रज’ या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात वेलणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात कवी आणि लेखक प्रवीण दवणे आणि विसुभाऊ बापट उपस्थित होते. त्यांच्याशी सदानंद जोशी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रवीण दवणे यांनी तात्यासाहेबांच्या सशक्त लेखणीतून मानवी जगण्याचे आणि व्यवहाराचे दर्शन घडल्याचे सांगितले, तर विसुभाऊ बापट यांनी कुसुमाग्रज हे साहित्यातील अमृत वृक्ष होते, असे सांगितले. यावेळी अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील मस्तानीचा प्रवेश सादर केला. याप्रसंगी नीलिमा पवार, दीपक करंजीकर, एन. सी. देशपांडे, विवेक गरुड, दत्तात्रय कोठावदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक