शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडाव; इंदिरानगरवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:11 IST

इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

इंदिरानगर : महावितरणकडून इंदिरानगर परिसरात होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या भागात विजेचा नेहमी लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून, या भागात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.महावितरण कंपनीचे इंदिरानगर परिसरात स्वतंत्र सबस्टेशन झाल्यास सुमारे २५ वर्षांपासून सुरू असलेल्या विजेच्या लंबडावाचा प्रश्न सुटणार आहे. सध्या इंदिरानगर कक्ष कार्यालय अंतर्गत सुमारे पंचवीस हजार ग्राहक आहेत. भारतनगर सबस्टेशनमधून भारतनगर, शिवाजीवाडी विनयनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सूचितानगर, वडाळागाव, कमोदनगर, जयदीपनगरसह परिसरास विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर पाथर्डी सबस्टेशनमधून वडाळागाव, इंदिरानगर मेहबूबनगर, समर्थनगर, सराफनगर, शरयूनगर, पांडवनगरी, कैलासनगर, सार्थकनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, श्री राजसारथी सोसायटी, रथचक्र सोसायटी, महारुद्र्र कॉलनी, अरुणोदय सोसायटीसह परिसराला विद्युत पुरवठा करण्यात येतो. इंदिरानगरच्या या भागात सुमारे दहा वर्षांपासून नियमित विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.भारतनगर व पाथर्डी सब स्टेशनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे वीजग्राहकांची संख्याही वाढत असून, या दोन्ही उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातीतल वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची प्रकार घडत असून पावसाळ्यात यात आणखीच भर पडत असल्याने इंदिरानगरवासीयांकडून परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.----------------------------इंदिरानगर परिसरात वारंवार विजेच्या लपंडावामुळे अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतनगर व पाथर्डी सबस्टेशनवरील भार कमी करण्यासाठी इंदिरानगर परिसरात तत्काळ स्वतंत्र सबस्टेशन सुरू करण्याची गरज आहे. असे केल्यास या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊ शकेल.- रमिज पठाण, नागरिक, इंदिरानगर

टॅग्स :Nashikनाशिक