शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पैसे लाटण्यासाठी रातोरात उभ्या राहताहेत पोल्टीशेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:31 IST

गेल्या काही दिवसांपासून मालढोण, पाथरे, शिवडे, गोरवड, म-हळ, वारेगाव या गावांमध्ये अचानकपणे रातोरात पोल्ट्रीफार्मचे कच्चे-पक्के शेड उभे राहात असल्याचे पंचक्रोशीतील शेतक-यांमध्ये हा चर्चेचा व कुतूहलाचा विषय झाला असला तरी, चौकशी अंती यामागे शासनाची कोट्यवधीची फसवणूक

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : अधिका-यांचाही गैरव्यवहारात हात असल्याचा संशयजमिनींचे मुल्यांकन वाढविण्यासाठी काही अधिकारी व शेतक-यांनी एकमेकांशी संगनमत

नाशिक : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची अधिका-यांकडून घाई चालविली जात असताना दुसरीकडे जमिनींचे मुल्यांकन वाढविण्यासाठी काही अधिकारी व शेतक-यांनी एकमेकांशी संगनमत करून विविध क्लृप्त्या लढविण्यास सुरूवात केली असून, विशेषत: मोजणी रखडलेल्या सिन्नर तालुक्यात रातोरात शेतक-यांच्या शेतात पोल्ट्रीफॉर्मचे शेड उभे राहू लागले आहेत. या सा-या प्रकरणात काही एजंटांनीही उडी घेतली असून, मिळणा-या वाढीव मोबदल्यातून ६०:४० असे सुत्रही निश्चित करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून मालढोण, पाथरे, शिवडे, गोरवड, म-हळ, वारेगाव या गावांमध्ये अचानकपणे रातोरात पोल्ट्रीफार्मचे कच्चे-पक्के शेड उभे राहात असल्याचे पंचक्रोशीतील शेतक-यांमध्ये हा चर्चेचा व कुतूहलाचा विषय झाला असला तरी, चौकशी अंती यामागे शासनाची कोट्यवधीची फसवणूक करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अधिकारी व शेतक-यांकडून केल्या जाणा-या या संयुक्त लुटीची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिका-यांकडे लोकशाही दिनात करण्याचा प्रयत्न केला असता, नावानिशी तक्रार करण्याचा सल्ला देवून गप्प बसविण्यात आल्याने तर या सा-या गैरप्रकाराचे पाळेमुळे किती खोलवर रूजले आहेत याचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहात नाही. ज्या जमिनी दहा ते बारा वर्षापासून पाण्याअभावी कोरडवाहू म्हणून गणल्या जावून शेतक-यांनी तिच्या कसण्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशा जमिनींवर आता शेतीपुरक व्यवसायाचे पीक फोफावले आहे. साधारणत: एक ते दिड लाख रूपयांपर्यंत खर्च करून रातोरात पोल्ट्रीफार्मचे शेड उभे केले जात आहेत व जमीनीच्या मुल्यांकनासोबत पोल्ट्रीशेडच्या नुकसान भरपाईचे लाखो रूपये उकळण्याचा धंदा तेजीत सुरू झाला आहे. मुळात समृद्धी महामार्गासाठी शासनाने बाजारमुल्यापेक्षा पाच पट दर निश्चित केले असून, त्यातही बागायती, कोरडवाहू व हंगामी बागायतीसाठी वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहे, त्या जोडीला शेतक-याच्या शेतातील विहीर, झाडे, फळझाडे, पीक, पाईपलाईन, घर आदी मालमत्तेचे वेगळे मुल्यांकन करून त्याचीही भरपाई दिली जात असल्यामुळे शेतक-यांना एकरी वीस ते बावीस लाख रूपयांहून अधिक रक्कम मिळू लागली आहे. सरकारला जागेची असलेली निकड लक्षात घेऊन अधिकारी वर्ग देखील शेतकºयाच्या कलेने चालत असल्यामुळे नेमका त्याचा फायदा उचलणारी टोळी या सा-या प्रकारात अचानक कार्यरत झाली असून, त्यांना शासकीय यंत्रणेची जोड मिळत असल्याची खुलेआम चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक