शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

भगुरला सरकारी जागेवर पोल्ट्री फॉर्म, पक्की घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:19 IST

भगूरातील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे.

ठळक मुद्देक्रिडांगणाचे आरक्षण : अतिक्रमीत जागेत अवैध धंदेगावठी दारू, तंबाखू, गुटखा विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

भगुर : भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रिडांगण आरक्षित सरकारी भुखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्री फार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अ‍ॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.या संदर्भात बलकवडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगूरातील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे. मात्र काही झोपडपट्टीवासियांनी या जागेवर अतिक्रमण करून वसाहतीसह अवैध धंदे सुरू केले. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही सदर अतिक्रमण हटविले जात नाही. या जागेच्या लगत राम मंदिर असून तीन शाळा व एक व्यायामशाळा आहे. अतिक्रमीत जागेवर गावठी दारू, तंबाखू, गुटखा विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ पहात आहे. सावरकरांची जन्मभूमी असलेल्या या नगरीत देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र येथील बकाल अवस्थेमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत असल्याचे म्हटले आहे.चौकट====बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचाºयाविनाबलकवडे यांनी सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती अधिकारात जाणून घेतले असता, मुख्याधिकाºयांनी नगर परिषदेकडे २०१७ पासून कायमस्वरूपी अभियंता नाही व बांधकाम विभागाकडे एकही कर्मचारी नसल्याने कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे येथील प्रशासन त्यांच्या कामात कसूर करत असल्याने त्यांच्या विरोधात भादंवि १६६ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक