शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

पोल्ट्री व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:56 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’चा धसका : जिल्ह्यातील ३०० कोटीची उलाढाल धोक्यात

अमोल अहिरे ।जळगाव निंबायती : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.याचा विपरित परिणाम होऊन जिल्ह्यात महिन्याला तीनशे कोटी रुपयांचा होणारा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील चिकन विक्र ीमध्ये जवळपास ७० टक्के घट आढळून आली. शेजारच्या राज्यांमधून होणारी चिकनची मागणी ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली. कोंबडीच्या एका अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येतो.मात्र सध्या मागणी घटल्याने अंड्याची विक्री ३ रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे उत्पादकांना दररोज हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या काळात हे चित्र बदलले नाही तर पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.कोरोनाचा विषाणू पक्ष्यांच्या कच्च्या मांसापासून प्रसारित होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे, मात्र देशभरात पूर्ण शिजविलेले मांस खाल्ले जात असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा विषाणू असण्याची शक्यता जवळपास नाही. असे असतानाही लोक खोट्या अफवेवर विश्वास ठेवून कोरोना विषाणूच्या संकटाने भयभीत झाले आहेत.जनजागृती करण्याची मागणीशेतीपूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले होते, लाखो रुपयांचे बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता, मात्र तोही व्यवसाय आता संकटात सापडला आहे. याची शासनाने तातडीने गंभीरपणे दखल घ्यावी व राज्यातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करुन पोल्ट्री व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी परिसरातील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.कुक्कुटपालन व्यवसायासाठी दरवर्षी जानेवारी ते एप्रिल हा काळ मंदीचा मानला जातो. त्यातच कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लू या आजारामुळे कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला होता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी. - शशी ढोणे, पोल्ट्री व्यावसायिक, जळगाव निंबायतीगेल्या आठवडाभरापासून कोरोना विषाणूच्या अफवेमुळे चिकनची मागणी ५० ते ६० टक्कांपर्यंत कमी झाली आहे यामुळे चढ्या दराने बॉयलर कोंबड्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे, यामुळे फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. मांसाहारी लोक आता बोकडाच्या मांसाला पसंती देत असल्याने पुढील काळात मटणाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अशरफ शेख,विक्रेता जळगाव निंबायती.

टॅग्स :businessव्यवसायHealthआरोग्य