शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावरील हंडा उतरला जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:21 IST

सुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना पाणी वाहतूक करण्यासाठी संस्थेमार्फत वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देसुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

सुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना पाणी वाहतूक करण्यासाठी संस्थेमार्फत वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण करण्यात आले.पाण्याच्या एक-एक थेंबाकरिता आदिवासी भगिनींची रानावनातील भटकंती थांबायला हवी. जीवनभर चाललेला हा पाण्याकरिताचा संघर्ष स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडून तरी थांबणार का, अशी खंत सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष शिल्पा शिंदे यांनी खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण प्रसंगी व्यक्त केली.यावेळी संस्थेच्या संचालक मनिषा निकुंभ, प्रियंका भंडारे, शाम चव्हाण, स्वप्निल साळवे, जलपरिषद सदस्य शिक्षक रतन चौधरी, अरुण सुबर, पोलीस पाटील मनिराम पाडवी, शिवा धुम, परशराम पाडवी, सावित्री वळवी, यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत संस्थेने महिलांना सहजरीत्या पाणी आणता आले पाहिजे. पाणी हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाण्याकरिता डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या भगिनींना डोक्यावर हंडा घेऊन उन्हातान्हाची, विंचू काट्याची पर्वा न करता, रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून पाण्याच्या शोधात हिंडावे लागते, याकरिता संस्थेच्या वतीने पन्नास कुटुंबांना नीर चक्राचे वाटप करण्यात आले आहे.महिलांच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा, तसेच पाण्याकरिता सोसावे लागणारे कष्ट, संघर्ष टाळता आला पाहिजे. कमी वेळात जास्त पाणी आणता यायला हवे. कष्टकरी महिलांचा वेळ वाचला पाहिजे. पाणी डोक्यावर वाहताना मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबर, मान, हात पाय दुखणे ही दुखणी टाळता आली पाहिजेत. या हेतूने या गावात वेल्लो व्हॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.यावेळी यशवंत वाघमारे, धवळू पाडवी, गोविंदा पालवी, जाणू पाडवी, सीताराम वाघमारे, दीपक पवार, सोनिराम वाघमारे, परशुराम वाघमारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक