शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमनकडून आधार कार्डचा ‘बाजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:08 IST

टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी

ठळक मुद्देतक्रारी प्राप्त : देवळालीगाव परिसरातील प्रकार

नाशिक : नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. आधार कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने शहरात ठिकठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. ज्याच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे काम संबंधित केंद्रांवर केले जाते. दुरुस्ती केलेले कार्ड टपालाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळेल, असे सांगितले जाते. परंतु दुरुस्ती केल्यानंतही दोन ते तीन महिने ग्राहकांना दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळतच नसल्याचा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात टपाल कार्यालयाकडे तक्रार करूनही ग्राहकांना अजून आधार कार्ड मिळालेले नाही. ही परिस्थिती केवळ नाशिकरोडची नव्हे तर गांधीनगर, उपनगर, अशोकामार्ग, टाकळी येथील नागरिकांची तक्रार आहे. नाशिकरोडमधील गोसावीवाडी, पवारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, देवळालीगाव परिसरातील अनेक नागरिकांना आधार कार्ड मिळाले नसल्याची तक्रार आहे. टपालचा बटवडा करणारे पोस्टमन घरोघरी दुरुस्ती केलेले आधार कार्ड वितरित करीत नसून एखाद्या दुकानात संपूर्ण परिसरातील कार्ड देऊन निघून जात असून, संबंधित दुकानदार कार्ड घेण्यासाठी येणाऱ्याकडून पैसे उकळत असल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. हा सारा गैरप्रकार होत असताना टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकAdhar Cardआधार कार्ड