शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

एकलहरे वीज केंद्रात श्वान पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:58 IST

एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेची दखल घेत

ठळक मुद्देसुरक्षितता : संशयितांवर राहणार नजर डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश

नाशिक : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेची दखल घेत मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसराची सुरक्षा व्यवस्था कडक केली. चेमरी नंबर एकचे गेट क्रमांक एक व सिद्धार्थनगर जवळील नवीन डी टाइपचे गेट नंबर दोन येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची, वाहनांची, एस.टी. बसेसची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनावश्यक ये-जा करणारे व आगंतुकांना आळा बसण्यास मदत झाली. परंतु एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षिततेचा विचार करता १८ आॅगस्टपासून परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर फडतरे यांच्या नियंत्रणाखाली श्वान पथक कार्यरत असून, त्यात प्रशिक्षित डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रशिक्षित कर्मचारीही आहेत. हे श्वानपथक वीज केंद्र व रहिवासी कॉलनी व्यतिरिक्त वसाहतीबाहेरील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, देशमुखवाडी, पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरे गाव, वीज केंद्राची चहुबाजूची संरक्षक भिंत, एकलहरे बंधारा, गंगावाडी परिसर या भागात गस्त घालेल. या प्रशिक्षित श्वान पथकामुळे भुरट्या चोºया व संशयित इसमांना आळा बसेल. वीज केंद्र प्रशासनाच्या वतीने पंचक्रोशीतील रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, वीज केंद्र व वसाहतीमध्ये कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करू नये तसेच मोकाट जनावरे वसाहतीमध्ये सोडू नयेत. रात्री-अपरात्री कोणीही फिरू नये, वसाहतीत प्रवेश करतेवेळी विशेष दक्षता घ्यावी.(फोटो आरवर २० एकलहरे नावाने) एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले श्वान पथक व कर्मचारी.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक