शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने टॅँकर वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:16 IST

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने त्याचा आढावा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी शुक्रवारी घेतला.

नाशिक : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने त्याचा आढावा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी शुक्रवारी घेतला. जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे काही तालुक्यांमध्ये १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढणार असतील तर तालुक्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगळे यांनी दिले.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणीटंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेऊन प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शीतल सांगळे यांनी यावेळी दिले. यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेऊन विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. याबाबत या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला आहे.टँकर वाढत असतील तर तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे उप अभियंता आदी उपस्थित होते.जिल्ह्यात जूनपर्यंत ३९७ टँकर सुरू होते, मात्र ५ जुलैपर्यंत यातील ९७ टँकर कमी झाले आहेत. मात्र तरीदेखील सिन्नर, बागलाण, नांदगाव, येवला, मालेगाव व देवळा तालुक्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने या तालुक्यांमध्ये आढाव्यानुसार १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई