शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भात पिकांवर प्रादुर्भावाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:22 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आलेली भातशेती संकटात ...

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आलेली भातशेती संकटात सापडली आहे. सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते मात्र पाऊसच गायब झाल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाअभावी तालुक्यात काही भागांत भाताची रोपे करपू लागली आहेत. याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल,असा अंदाज वर्तवला होता. यामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.-------------------जिल्हा अजूनही कोरडाचपावसाळा सुरू झाल्यापासून अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके हिरवी दिसत असली तरी त्यांचा उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, सटाणा, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये सोयाबीन, मका बाजरीची पेरणी झाली असली तरी अपेक्षित असा पाऊस होत नसल्याने पिके करपण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने समाधान असले तरी पिकांची चिंता मात्र वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक