शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीसाठी  सक्तीने जमीन संपादनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:52 IST

राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील दहा जिल्ह्यांमधील समृद्धी प्रकल्पाची उर्वरित जमीन अधिग्रहण याच कायद्याच्या आधारे होणार आहे.या नव्या अध्यादेशामुळे शेतकºयांना पाचपटीऐवजी चारपटच म्हणजे २५ टक्के कमी मोबदला मिळणार आहे, तर ७० टक्के शेतकºयांच्या संमतीची आवश्यकता नसल्याने प्रशासनाची आता भूसंपादनाची चिंता मिटणार आहे. नागपूर ते मुंबई हा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जातो. प्रकल्पासाठी प्रथम लँड पुलिंग पद्धतीने होणाºया भूसंपादनास नाशिक, ठाणे, औरंगाबादसह पाच जिल्ह्यांमध्ये विरोध झाला. त्यावर राज्य शासनाने थेट  खरेदीने जमीन संपादित केली. बाजारभावाच्या पाचपट दर शेतकºयांना देण्यात आले. तरीही जिल्ह्णातील सिन्नरमधील शिवडे व डुबेरेसह राज्यातील सुमारे २५ ते ३० गावांमधील संयुक्त मोजणीस विरोध सुरूच असल्याने ते काम अद्यापही रखडले आहे. जमीन अधिग्रहणाला होणारा विरोध पाहून आता सरकारने थेट भूसंपादन कायद्यात आवश्यक ते बदल केले. दुरु स्तीसह या कायद्यातील बदलास राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता समृद्धीसाठी जमीन देण्यास विरोध करणाºयांच्या जमिनी थेट भूसंपादन कायद्यानुसारच परंतु प्रसंगी सक्तीने संपादन केल्या जातील.यामुळे आता शेतकºयांनी याविरोधात न्यायालयातही तक्र ार केल्यास बाधितांच्या नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करून प्रकल्पाचे काम पूर्ण करणे यंत्रणेस शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रखडलेल्या जमिनीच्या मोजणीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सरकारकडे दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून सर्वच जिल्ह्णांतील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना एकत्रित काढली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.नाशिकमध्ये ७०५ हेक्टर संपादननाशिकमधील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधील ४९ गावांमधील जमीन समृद्धी  प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जात आहे. एकूण १२८० हेक्टर जमीन  प्रकल्पासाठी लागणार आहे. यातील ११५० हेक्टर जमीन खासगी असून, इतर क्षेत्र  हे वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. आजमितीस खासगी व सरकारी मिळून  एकूण ७०५ हेक्टर म्हणजे ६८ टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग