शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लूटमार करणारी परराज्यांतील टोळी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:19 IST

शहरात आठवडाभरापूर्वी एकाच दिवशी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पद्धतीने वाहनचालकांच्या लुटीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांमधील लुटीचे कारण एकसमान असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत परराज्यांतील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या यापक्ररणी आवळल्या आहे.

नाशिक : शहरात आठवडाभरापूर्वी एकाच दिवशी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पद्धतीने वाहनचालकांच्या लुटीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांमधील लुटीचे कारण एकसमान असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत परराज्यांतील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या यापक्ररणी आवळल्या आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘तुमच्या वाहनातून आॅइल गळती होत आहे’, असे सांगून वाहनचालकांचे लक्ष विचलित करून वाहनामध्ये ठेवलेल्या रोकड व महागड्या वस्तूंच्या बॅग लंपास करण्याच्या घटना काही दिवसांपूर्वी शहरात घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, दिल्ली येथील पाच संशयितांना पथकाने अटक केली. यामध्ये संजय मुनियांदी (३०), बबलू फकिरा (३५), किसन सेलूराज (३०), करण गणेश (३०), अभिमन्यू बबलू (१९, सर्व रा. दिल्ली) यांच्यासह एक अल्पवयीन संशयिताचा या टोळीत समावेश आहे. यांच्यासह एका अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रुपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापूर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून अशाप्रकारचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.संशयितांचा प्रवाससीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी पथकासह पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यात संशयितांचा पाठलाग करताना सर्व संशयितांनी थेट अहमदनगर गाठले व तेथून शिर्डीत दडून बसल्याची माहिती कुलकर्णी यांना मिळाली. त्यावरून पथकाने शिर्डी गाठून अथक शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाच संशयित आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.सीसीटीव्ही फूटेजवरून सुगावाएकाच दिवशी एकाच पद्धतीने दोन ठिकाणी एकाचवेळी झालेल्या चोरीच्या घटनांनी नाशिककर हादरले होते. गुन्ह्याची कार्यप्रणाली समान असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी के ली. काही सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचे वर्णन पोलिसांना लक्षात आले.पावणेनऊ लाखांचा मुद्देमालगुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांची कसून झडती घेत त्यांच्याकडून मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील चांडकसर्कलवर घडलेल्या गुन्ह्यातील ७०ग्रॅम सोन्याच्या दोन पाटल्यांसह सरकारवाडा हद्दीतील गुन्ह्यातील रोख रक्कमेपैकी ५९ हजारांची रोकड, २ आॅइल बॉटल, १ कुलंट बॉटल, लहान रंगाचा डबा, ५ मोबाइल, असा एकूण ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्ह्याची आगळीवेगळी शक्कलसंशयित आरोपींची टोळी वाहनांची ‘रेकी’ करून मोठ्या हातचालाखीने वाहनांजवळ आॅइल, कुलंटसारखे द्रव्य टाकून देत, वाहनातून आॅइल गळती होत असल्याचे सांगून वाहनचालकाचे लक्ष विचलित करून त्याला वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडत होते. वाहनामध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंच्या बॅग घेऊन चोरटे पसार होत होते. या टोळीने चांडक सर्कल, रविवार कारंजा परिसरात गुन्हे केले होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी