शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या कारखान्याचे भुखंड धनदांडग्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:03 IST

नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने

ठळक मुद्देजागा विनावापर पडून : नवीन कारखान्यांना मात्र प्रतीक्षाअसंख्य लघु उद्योजक भाडेतत्त्वावर गाळा घेऊन वर्षानुवर्षे उद्योग व्यवसाय करीत आहेत

नाशिक : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवलेल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बंद कारखान्यांची जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याने प्रस्तावित औद्योगिक धोरणात तसा कायदा करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे.नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणाºया जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने उद्योग येऊ घातले तरी त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यावी, हा प्रश्न भेडसावित आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेताना तीन वर्षांत त्यावर उद्योग उभारून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे असा नियम आहे. परंतु अनेकांनी उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली भूखंड घेऊन ठेवत गुंतवणूक करून ठेवली आहे. मागील काही महिन्यांपासून एमआयडीसीने कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत त्यांच्या ताब्यातील भूखंड परत घेण्यास सुरुवात केली आहे.बॅँकांचे थकलेले कर्ज, भागीदारीतील वाद, चुकीचे व्यवस्थापन, कामगार कलह, उत्पादनाच्या मागणीत घट, जुने तंत्रज्ञान, कौटुंबिक वादविवाद यासह अनेक बाबींमुळे सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक लहान, मोठे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत. यातील काही कारखान्यांची जागा बिल्डर्स किंवा धनदांडग्यांनी घेऊन त्यात पैसे गुंतवून ठेवले आहेत. वास्तविक पाहता जागा घेऊन त्यावर उद्योग उभारणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू शकला असता. आता धनदांडग्यांनी जागा घेऊन ठेवल्याने हे भूखंड अनुत्पादक झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर उद्योगासाठी जागेची गरज आहे. त्यांना जागा मिळत नाही. परिणामी असंख्य लघु उद्योजक भाडेतत्त्वावर गाळा घेऊन वर्षानुवर्षे उद्योग व्यवसाय करीत आहेत. त्यांनाही उद्योग विस्तारासाठी अतिरिक्त जागेची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Indu Malhotraइंदू मल्होत्राNashikनाशिक