शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी नऊ गावांतील २० गटांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, सोनांबे येथे ताबा मिळवताना अडथळा आणणाऱ्या एकावर पथकाने गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गाचे तालुक्यात वेगाने काम सुरू आहे. जमिनीचा ताबा देण्यासाठी मालकांमधील वैयक्तिक हेवेदावे, प्रत्यक्ष कब्जासाठीचे अडथळे, मोबदला घेऊनही ताबा न देणे, जमीन देण्यास विरोध आदी समस्यांमुळे नऊ गावांतील २० गटांवर प्रत्यक्ष ताबा घेता आला नव्हता.यातील काही गट क्रमांक महामार्गाच्या मध्यभागी होते. त्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ताबा घेण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर बुधवारपासून दोन दिवस कार्यवाही करण्यात आली.------------------------------सोनांबेत विरोध करणाºयावर गुन्हासोनांबे येथे गट क्रमांक ७३७चा ताबा घेण्यास गेलेल्या नायब तहसीलदार नितीन गरजे यांच्या पथकाला विरोध करण्यात आला. योगेश ठोंबरे यांनी ताबा देणार नसल्याचे पथकाला सांगितले. ताबा घेण्यापासून परावृत्त केल्यामुळे तलाठी लक्ष्मण हरणे यांनी ठोंबरे यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या उपस्थित गटातील घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला. या गटावर ७५ जणांची नावे आहेत.---------------------१ महामार्गाच्या टप्पा क्रमांक बारामध्ये दुसंगवाडी, मºहळ खुर्द, खंबाळे व टप्पा क्र. १३ मध्ये सोनांबे, शिवडे, बेलू येथे जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही करण्यात आली. गुरुवारी टप्पा क्र. १२मधील दातली, पाटोळे, जयप्रकाश नगर येथे कार्यवाही केली.२ नायब तहसीलदार, दोन मंडल अधिकारी, दोन तलाठी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एका जणाचा प्रत्येक पथकात समावेश होता. पथकांसोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तीन गटांत घरे असल्याने जेसीबीच्या साहाय्याने ती पाडण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक