शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महानगरात सकारात्मक प्रतिसाद; जनता घरात रस्त्यावर शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 10:35 IST

 नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला महानगर आणि परिसरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद  मिळाला. त्यामुळे ...

 नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला महानगर आणि परिसरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद  मिळाला. त्यामुळे सकाळी बहुतांश परिसर निर्मनुष्य होते. मात्र, जुने नाशिक आणि गावठाण परिसरात  सकाळच्या  दूध खरेदीसाठीची गर्दी दूध बाजार परिसरात कायम असल्याने या भागातील प्रतिसाद हा संमिश्र स्वरूपाचा दिसून आला. महानगर आणि परिसरात रविवारच्या जनता संचारबंदी सकाळी आठ वाजेपर्यंत नागरीकांचा संमिश्र प्रतिसाद होता.  गोदाकाठ, फुलबाजार, मेन रोड, जॉगिंग ट्रॅक, सीबीएस चौक, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर निर्मनुष्य असले, तरी दूध बाजार नेहमीच्याच गर्दीत सुरू होता. नागरीकांनी दररोजपेक्षा काहीशी कमी पण दूध खरेदी करण्यास गर्दी केली होती.  दूध बाजारात जाऊन किंवा नेहमीच्या दूध विक्रेत्याकडे जाऊन दूध आणणे ही नाशिककरांची खासियत असलेली सकाळची दूध खरेदी सुरू होती. मात्र,  शहरातील शालिमार,  रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, मेहेर चौक, सीबीएस चौक, द्वारका आदि प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये अत्यंत किरकोळ स्वरूपात वाहनांची  वर्दळ होती.  दूध खरेदीची गर्दी देखील सकाळी आठपर्यंत अधिक होती. त्यानंतरच्या वेळेत खरेदीची गर्दी ओसरू लागली.  त्यामुळे केलेले जनता संचारबंदीचे  केलेले आवाहन काही प्रमाणात यशस्वी होत असल्याचे चित्र सकाळच्या वेळेत दिसून आले.   नाशिकमध्ये  पहाटेपासूनच फुलणारा फुलबाजार रविवारी मात्र फुलला नाही.  त्यामुळे या बाजारात दिसणारी नेहमीची गर्दी आणि वर्दळ अजिबातच नव्हती. फुल विक्रेत्यांनी  जनता संचारबंदी ला पुरेपुर प्रतिसाद दिल्याचे चित्र काळी दिसून येत होते. तसेच दशक्रियेसाठी देखील पाच सात कुटुंबे मोजक्याच नातेवाईकांसह आलेले होते .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस