मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सकाळी अकरा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय वहातुकदारांनी घेतला आहे. मनमाड पासून सात किमी अंतरावर पानेवाडी थोटाने परिसरात इंडियन आॅइल कंपनीचा गॅस रिफिलिंग प्रकल्प असून त्यातून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. त्यासाठी ट्रॅक वाहतुकीसाठी निविदा काढली जाते. प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी करून अपमानास्पद वागणूक तर देत असताच शिवाय आता त्यांनी स्थानिक ऐवजी बाहेरच्या वाहतूकदारांकडून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप स्थानिक वाहतूक दारांनी करून संप पुकारला होता.संपाच्या आजच्या तिसºया दिवशी या बाबद तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार,आमदार सुहास कांदे ,प्रकल्प व्यवस्थापक सुहास बनपूरकर यांच्या समवेत वहातूकदारांची बैठक घेण्यात आली. यात सकारात्मक चर्चा झाल्याने उद्या सकाळी संप मागे घेण्याचा निर्णय वहातूकदारांनी घेतला आहे. यावेळी वहातूकदार नाना पाटील ,रतन शाक द्विपी, कांतिलाल लुणावत, संजय पांडे, संजय चोपडा आदी उपस्थित होते.
खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:10 IST
मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सकाळी अकरा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय वहातुकदारांनी घेतला आहे.
खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा
ठळक मुद्देमनमाड :गॅस प्रकल्पातील वहातुकदारांच्या संपावर तोडगा