शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

डेरेदार झाडांचा श्वास गुदमरला

By admin | Updated: September 27, 2016 01:19 IST

‘ट्री-गार्ड’ रुतले बुंध्यात : पर्यावरणस्नेही देणार पालिकेला अल्बम भेट

नाशिक : शहरात विविध रस्त्यांच्या कडेला किंवा मोकळ्या भुखंडांवर पाच ते दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांभोवतालच्या संरक्षक जाळ्या थेट झाडांच्या बुंध्यात रुतल्या आहेत. याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकरोडच्या काही तरुणांनी एकत्र येत झाडांच्या संरक्षक जाळ्यांमुळे वृक्षांची झालेली स्थिती कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहे.रोपट्याचे संवर्धनासाठी महापालिकेने संरक्षक जाळ्या बसविल्या. झाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर झाडांभोवती लावलेल्या संरक्षक जाळ्या काढून घेणे अपेक्षित आहे; मात्र याकडे उद्यानविभागाने नेहमीप्रमाणे डोळेझाक केली आहे. यामुळे झाडांचा जीव संकटात सापडला असून, या हृदय हेलावणारी अवस्था नाशिकरोड पर्यावरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कॅ मेऱ्यात बंदिस्त केली आहेत. सुमारे पंचवीस ते तीस छायाचित्रे नाशिकरोड, उपनगर परिसरातील असून, सदर छायाचित्रांचे अल्बम समितीकडून उद्यान विभागप्रमुखांना भेट दिला जाणार असल्याची माहिती उपक्रमप्रमुख प्रसाद देशमुख यांनी दिली.संरक्षक जाळ्यांमुळे झाडांच्या बुंध्यांना इजा होत असून, झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण होऊन त्यांचे आयुष्य संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणी झाडांच्या बुंध्यांमध्ये संरक्षक जाळ्या पूर्णपणे रुतून गेल्या आहेत. सदर वृक्ष ही किमान पाच ते दहा  वर्षे जुने असून, याकडे पालिकेच्या उद्यान विभागाला लक्ष देण्यास अद्याप मुहूर्त लाभलेला नाही किंंवा वृक्ष प्राधिकरण समितीनेदेखील सदर बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही हे विशेष! (प्रतिनिधी)