त्र्यंबकेश्वर : केंद्र सरकारच्या १००० व ५०० रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका त्र्यंबकमध्ये पूजाविधीसाठी व यात्रेसाठी आलेल्या भाविकांना बसला असून, ते क्षणात कंगाल झाले आहेत. त्यांच्या गावाला ते श्रीमंत असतील; पण आज दोन वेळच्या जेवणाला अगर चहाला महाग झाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. बँका बंद, एटीएम बंद, काही घ्यावे म्हटले तर १०० रुपयाची नोट आणा, असे दुकानदार फर्मावतानाचे चित्र बुधवारी त्र्यंबकमध्ये पाहावयास मिळाले. सरकारच्या हा निर्णय अनपेक्षित असल्याने त्र्यंबकेश्वरला आलेल्या यात्रेकरूंची तारांबळ उडाली. ब्राह्मणांनीदेखील ५०० व १००० च्या नोटांची दक्षिणा नाकारली. भले तर मनिआॅर्डरने पाठवा अथवा आॅनलाइन खात्यावर जमा करा; पण या नोटा नको, असे अनेकांनी सांगितले.
र्यंबकला आलेले भाविक सुट्या पैशांअभावी ठरले कंगाल !
By admin | Updated: November 9, 2016 23:08 IST