त्र्यंबकेश्वर : येथून जव्हार फाट्या-पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एमव्हीपी कॉलेज ते जव्हार हायवेपर्यंत वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत असून, संबंधित विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कॉलेज रोड सन २००३-०४च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तयार केला आहे. आज हा रस्ता १७ वर्षांचा झाला आहे तर गजानन महाराज चौकापर्यंतचा रस्ताही त्याचवेळी केला आहे. आज कॉलेजरोडच्या रस्त्याची दैन्यवस्था झाली आहे. गजानन महाराज प्रवेशद्वाराजवळील रस्त्यात खड्डे पडल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी अपघात होतात. तसेच वाहने चालवणे मुश्कील होते. नगर परिषदेने या दोन्हीही रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी अशोक गाजरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:02 IST