सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची देखभाली अभावी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 05:40 PM2020-09-05T17:40:41+5:302020-09-05T17:41:21+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची देखभाली अभावी दुरावस्था होत आहे. नायगाव खोऱ्यातील रस्त्यांवर मैल कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

Poor condition of roads in northern part of Sinnar taluka | सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची देखभाली अभावी दुरवस्था

सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्यावर जायगाव शिवारात असे पाणी साचत आहे.अशाच प्रकारे ब्राम्हणवाडे - शिंदे या रस्त्यावरही पाणी साचत आहे.त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे.

Next
ठळक मुद्देनायगाव खो-यातील रस्त्यांवर मैल कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची देखभाली अभावी दुरावस्था होत आहे. नायगाव खोऱ्यातील रस्त्यांवर मैल कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
नायगाव खोºयातील सर्वच रस्त्यांवर गेल्या काही वर्षांपासून मैल कामगार नसल्यामुळे सर्वच रस्त्यांची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. परिसरातील प्रत्येक रस्त्यावर छोटे-मोठे असंख्य खड्डे पडले आहे. हेच खड्डे लवकरच माती किंवा मुरूम टाकून बुजविणारे पुर्वी सारखे मैल कामगार नसल्याने हे खड्डे वश्वर्ष असचे राहत आहे. परिणामी रस्त्यांची चाळण होत आहे.
नायगाव - सिन्नर रस्त्यावर ठिकाणी अनेक जीवघेणे मोठ-मोठे खड्डे पडले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून रस्त्यावर खड्डे पडत आहे. मात्र शासनाने हे कामगारच ठेवले नसल्याने रस्त्यांची दुरवस्था वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यांवर पुर्वीप्रमाणे मैल कामगारांची नियुक्ती करून रस्त्यांच्या कामाची वेळीच दुरूस्ती करण्याची मागणी नागरीक करीत आहे.

नायगाव खोºयातील सर्वच रस्त्यांची सध्या दुरवस्था वाढली आहे. त्यातच नायगाव-सिन्नर या तेरा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे तर पडलेच आहे. मात्र दोन्ही बाजूच्या साईडपट्या खोलवर गेल्या आहे. त्यातच रस्ता अरूंद असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. खड्डे व साईडपट्टीमुळे हा रस्ता अपघात प्रवण बनला आहे.
 

Web Title: Poor condition of roads in northern part of Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.