शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:46 IST

सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे.

ठळक मुद्देशौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे.शौचालयाजवळ पाणी व्यवस्था नाही. सेफ्टी टँकला झाकणच नाही. मागील काही महिन्यांपासून महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील महिला महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. नगरसेवक लक्ष देत नसल्याची तक्रार आहे.सोयगावात दोन सार्वजनिक शौचालये असून, त्यापैकी एक मागील काही वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ तयार करण्यात आला आहे, तर दुसरे शौचालय हे पंचशीलनगर, विश्वकर्मा येथे आहे. त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. पंचशीलनगर विश्वकर्मा चौक, मळी, सुदामनगर, गावठाण (मारुती मंदिर परिसरातील) लोकांच्या वापराचा हा शौचालय होता. मात्र त्याची सध्या खूपच दुरवस्था झाली आहे. संडासला दरवाजे नाहीत, सेफ्टी टँकचे झाकण तुटले आहे. पाण्याची व्यवस्था नसून नियमित साफसफाईसुद्धा होत नाही. शोषखड्डे उघडे असून, मैला गटारीत जातो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातदारू बाटल्या, गुटखा पुड्या पडलेल्या आहेत.शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने गावातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी होत असताना महानगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. सोयगाव शौचालयांच्या दुरवस्थेमुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने शौचालयाच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने सुरू करावे. शौचालयांचे तुटलेले दरवाजे बसवून या ठिकाणी संरक्षक भिंतदेखील बांधून महिलांची होत असलेली गैरसोय टाळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.कोट... हद्दवाढमुळे गाव हे दहा ते बारा वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झाले आहे. सोयगाव गावठाणमध्ये जुन्या पध्दतीने गल्ली प्रकारात बांधलेली घरे असून, घरगुती शौचालय बनवण्यासाठी पुरेशी जागा नाही. शिवाय शोषखड्डे, सेफ्टी टँक बनविण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक शौचालय हाच एकमेव पर्याय आहे. शिवाय वाढती लोकसंख्या पाहता अद्ययावत सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे झाले आहे.- पंकज बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :Healthआरोग्यgram panchayatग्राम पंचायत