शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:19 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे :  सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.सिन्नर, संगमनेर, अकोला, कोपरगाव व येवला या पाच तालुक्यांंना जोडणारा नांदूरशिंगोटे ते वावी हा महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच शिर्डी येथे जाण्यासाठी भाविक याच पर्यायी मार्गाचा वापर करतात. गतवर्षीच सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा रस्ता असल्याने अवजड वाहनांची वर्दळही अलिकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नांदूरशिंगोटे ते वावी, तसेच कणकोरी फाटा ते निऱ्हाळे गावापर्यंत अनेक ठिकाणी नदीवरून फरशी पूल टाकण्यात आले आहेत, परंतु रस्त्यांचे डांबरीकरण करण्याआधी त्यांची उंची वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व भागातील मऱ्हळ, निऱ्हाळे-फत्तेपूर, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे आदी गावांतून जामनदी वाहत असून, यावर अनेक ठिकाणी फरशी पूल आहेत. नदीवरील पावसाचे पाणी वाहत असल्याने पाण्यात वाळू वाहत येऊन फरशी खालील सिंमेट पाईप वाळूने बंद झाले आहे. त्यामुळे पाणी फरशीवरून वाहत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी वाहनचालकांना, तसेच ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिसरातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, प्रवाशी, महिला वर्गाची चांगलीच तारांबळ उडते. गतवर्षी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जामनदी तब्बल तीन ते चार महिने दुथडी भरून वाहत होती. निऱ्हाळे येथील कामगाराला नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात फरशी पुलाची समस्या निर्माण होते, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद