नगरसुल-लहीत-जायदरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:12 PM2020-09-13T15:12:40+5:302020-09-13T15:13:07+5:30

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल ते जायदरे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून विभागाच्या टोलवाटोलवीमुळे रस्त्याकडे कित्तेक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे परीस्थीतीवरु न समजते. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. त्या नंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कामे केली नसुन आज पर्यंत ह्या रस्ता कामे केली असतील तर ती फक्त कागदोपत्री नोंद करून केली असावी असा अंदाज जनता व्यक करीत आहेत.

Poor condition of Nagarsul-Lahit-Zaydare road | नगरसुल-लहीत-जायदरे रस्त्याची दुरवस्था

नगरसुल-लहीत-जायदरे रस्त्याची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देनागरीक त्रस्त : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; बंधारा भरल्याने पाणी रस्त्यावर

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल ते जायदरे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून विभागाच्या टोलवाटोलवीमुळे रस्त्याकडे कित्तेक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे परीस्थीतीवरु न समजते. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. त्या नंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कामे केली नसुन आज पर्यंत ह्या रस्ता कामे केली असतील तर ती फक्त कागदोपत्री नोंद करून केली असावी असा अंदाज जनता व्यक करीत आहेत. हा रस्ता सुरवातीला जिल्हा परिषदेच्या अधिपत्या खाली होता. नंतर त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निगराणी खाली होता. परतु आज मात्र ग्रामीण मार्ग क्र . १०१ असुन मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत असल्याचे समजते. नगरसुल गावाजवळील वसंत बंधाºयालगत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून मागील वर्षीमोºयांना भगदाड पडले असून बंधाºयातील पाणी ह्या भगदातुन वर येत आहे. व मोरीतुन रस्त्याच्या दुसºया बाजूने वात आहे.ह्या रस्त्यावर आहेरवाडी, खिर्डीसाठे,जायदरे, लहीत, लोहशिंगवे, भालुर, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे गावातील लोकांना दररोज ये जा करावी लागते. त्याच प्रमाने नगरसुल गावचा मोठा भाग असल्याने कुडके वस्ती, निकम वस्ती, कदम वस्ती, धनवटे वस्ती, बोरसे वस्ती, अंबुमाळी वस्ती, अभंग वस्ती, कोंबडं वाडी, सानप वस्ती, धनगर वस्ती, खोकडे वस्ती, सह वस्त्याचा समावेश आहे. हे लोक जेव्हा प्रवास करतात तेव्हा खड्डे, पाणी यामुळे अपघात होतात.
नगरसुल ते जायदरे पर्यंत दुतर्फा काटेरी झाडांनी विळखा घातला असून समोरुन येणारी वाहने चालकाला दिसत नाहीत. पर्यायाने अपघात होतात. तसेच त्यावरु न अनेक वेळा वादविवाद होतात. हा रस्ता फक्त कागदोपत्री नोंद करून खर्च करून निधी काढला जात असावा अश्ी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
(फोटो १३ नगरसूल १)

Web Title: Poor condition of Nagarsul-Lahit-Zaydare road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.