लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील पुरातन पूल स्ट्रॅक्चरल आॅडिटच्या दृष्टिकोनातून योग्य असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या वतीने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक चांगल्या पुलांचे संरक्षक कठडे मात्र खराब असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि नेहमी रहदारी असलेल्या पुलांची अशी अवस्था झाल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळले आहे. गाडगे महाराज पूल आणि टाळकुटे पूल या ठिकाणीदेखील अशीच अवस्था झाली आहे. प्राथमिक आॅडिटमध्ये पूल सुरक्षित असल्याचे आढळले आहे. केवळ आडगाव येथील पूल तोडून नवीन पूल बांधावा लागला आहे. शहरातील बहुतांश पूल अलीकडच्या काळातील असले तरी काहींचे संरक्षक कठडे मात्र धोकदायक आहे.ब्रिटिशकालीन अहिल्यादेवी होळकर पुलाचे कठडे धोकादायक आहे. घारपुरे घाटावरील रामवाडी पुलाचीदेखील अशीच अवस्था आहे. पुलाकाठी असलेल्या संरक्षक भिंतीचीदेखील दुरवस्था झाल्याने त्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेड्स लावून धोका टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पूल सुरक्षित; कठडे धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:31 IST
नाशिक : शहरातील पुरातन पूल स्ट्रॅक्चरल आॅडिटच्या दृष्टिकोनातून योग्य असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या वतीने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक चांगल्या पुलांचे संरक्षक कठडे मात्र खराब असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
पूल सुरक्षित; कठडे धोकादायक!
ठळक मुद्देदुर्लक्ष : महापालिकेचे आॅडिट नावालाच; दुर्घटना होण्याची भीती