शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

डाळिंब, द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 23:59 IST

पाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

ठळक मुद्देयेवला तालुका : कोरोनाची महामारी, प्लेग खरड्या, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

गोरख घुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.डाळिंबबागांचीही अवस्था अशीच झाली. त्यातच या बागांवर प्लेग, खरड्या, तेल्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने बागा या रोगाच्या बळी ठरल्या आहे. या भागातील शेतकºयांनी डाळिंब व द्राक्षबागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या भागातील अडीच हजार हेक्टर द्राक्ष व साडेसातशे हेक्टर डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत.कोरोना महामारीमुळे तयार डाळिंबासाठी बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने तसेच ऐन विक्रीच्या तोंडावर फळांवर तेल्या तसेच झाडावर प्लेग खरड्याा या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तयार डाळिंब दहा रुपये किलो या कवडीमोल दराने विकावे लागल्याने बागेवर केलेला खर्चही वसूल झाला नाही त्यामुळे नाइलाजास्तव पाटोदा येथील शेतकरी सुकदेव मेंगाणे,अनिल मेंगाणे, दिनकर बोरणारे या शेतकºयांनी आपल्या डाळिंबबागांवर कुºहाड चालवीत डाळिंबबागा तोडून टाकत भुईसपाट केल्या, तर ठाणगाव येथील अनिल कव्हात, दीपक कव्हात या भावांनी आपली सुमारे चार एकर द्राक्ष बागेवर कुºहाड चालविली .शेतकºयांना आर्थिक फटकायेवला तालुक्यात हजारो क्विंटल डाळिंब झाडावर सडले; पाटोदा परिसरातील शेतकरी फेब्रुवारी मार्च महिन्यातील बहार धरत असतात. मात्र यावर्षी फळ तयार झाल्यानंतर फळावर तेलकट डाग निर्माण झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त फळ हे झाडावर सडून खराब झाले. त्यामुळे शेतकºयांनी हे फळ शेताच्या कडेला तोडून फेकून दिले आहे, तर उर्वरित डाळिंब फळाला मागणीअभावी दहा ते पंधरा रुपये किलो या कवडीमोल दराने विक्री करावी लागल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.पाटोदा परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष व डाळिंब शेतीकडे वळाले आहे. यातून शेतकºयांना चार पैसे मिळत होते. मात्र यावर्षी द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर जगात कोरोनासारख्या महामारीने वेठीस धरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुमारे चार लाख रुपये खर्च करून डाळिंबबाग उभी केली. तीन वर्षे चांगला नफा झाला, मात्र यावर्षी मोठा खर्च करूनही कोरोना महामारीमुळे डाळिंब विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातच ऐन विक्रीच्या वेळेस फळावर तेलकट डाग पडल्याने दहा ते बारा रुपये किलो आशा कावडीमोल दराने विक्री करावी लागली. केलेला खर्चर्ही वसूल झाला नाही. त्यातच बागेवर प्लेग, खरड्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अडीच एकर डाळिंबबाग तोडून टाकली .- सुकदेव मेंगाणे, पाटोदाशेतकºयांनी उत्पादित केलेल्या कोणत्याच मालाला दर मिळत नाही. लॉकडाऊनपासून तर शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. आठ ते दहा रुपये दराने द्राक्ष विक्री करावी लागली. त्यामुळे आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. उत्पन्न व उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. त्यामुळे वैतागून सुमारे चार एकर द्राक्षबाग तोडून टाकली.-अनिल कव्हात, शेतकरी, ठाणगाव.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी