जिल्ह्यात डाळिंबबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 04:34 PM2020-09-14T16:34:14+5:302020-09-14T16:35:26+5:30

निफाड/खेडलेझुंगे : निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील डाळिंबबागा करपा व बुरशीसारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आल्या असून, बागा तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

Pomegranate orchards in danger in the district | जिल्ह्यात डाळिंबबागा धोक्यात

जिल्ह्यात डाळिंबबागा धोक्यात

Next
ठळक मुद्देकरपा, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव : बागांवर कुºहाड चालवण्याची नामुष्की

निफाड/खेडलेझुंगे : निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील डाळिंबबागा करपा व बुरशीसारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आल्या असून, बागा तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
कमी खर्चात जास्तीचा नफा मिळवून देणारी फळबाग म्हणून डाळिंबाकडे बघतिले जाते. त्यामुळे खेडलेझुंगे, सारोळे थडी, धारणगाव वीर, रुई, कोळगाव, धारणगाव खडक परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून डाळिंबबागांवर भर दिला असून, या भागात डाळिंब पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
अनेक वर्षांपासून शेतकºयांच्या मागे संकटाची मालिका सुरू आहे. मागील वर्षापासून अवकाळी पाऊस, लष्करी अळी आता कोरोना यासारख्या अनेक अस्मानी, सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता पिचला आहे. त्यातच डाळिंबबागांवर प्लेग, तेल्या, मर आदी भयानक रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, शेतकºयांचे आर्थिक संकट गडद होत आहे. औषध, शेत मशागत, पिकांतर्गत मजुरीचा खर्च वाढता असल्याने शेतकºयांना डाळिंब पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. खेडलेझुंगे भागातील शेतकºयांनी द्राक्षबागा तोडून डाळिंब पिकास पसंती दिली होती; परंतु डाळिंबबागाही रोगाच्या विळख्यात सापडल्या आहेत. सारोळे थडी, धारणगाव वीर, रुई, कोळगाव, धारणगाव खडक परिसरातील अनेक बागांवर करपा, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव दिसत असून, शेतकरी संकटात सापडला आहे.

निसर्गाचा लहरीपणा
शेतकºयांनी द्राक्षबागांनंतर अनेक अपेक्षा ठेवून डाळिंब लागवड केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच राहिल्याने डाळिंबबागांवरही कुºहाड चालवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. डाळिंबबागांवर होणाºया करपा, बुरशीसारख्या रोगांमुळे परिसरातील सुमारे ४० टक्के डाळिंबबागा बाधीत झाल्या असून,शेतकºयांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. बागा तोडण्याशिवाय पर्याय नसल्याने डाळिंबावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला असून, शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. (१४ खेडलेझुंगे १/२)

Web Title: Pomegranate orchards in danger in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.