शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मानोरी परिसरात पाण्याअभावी डाळिंब बाग धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:51 IST

मानोरी : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेदिवस चिंतेत सापडला असून कधी कडाक्याचे ऊन, कधी कडाक्याची थंडी तर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असून आता तर कडाक्याच्या उन्हाने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी आता डाळींबाच्या बागा वाळू लागल्या आहेत.

ठळक मुद्देडाळिंब बाग हातातून जाण्याची शक्यता वाटू लागली आहे.

मानोरी : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेदिवस चिंतेत सापडला असून कधी कडाक्याचे ऊन, कधी कडाक्याची थंडी तर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असून आता तर कडाक्याच्या उन्हाने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी आता डाळींबाच्या बागा वाळू लागल्या आहेत.येवला तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांबरोबर डाळिंबाची बाग देखील धोक्यात आल्याचे दिसून येत असल्याने पुढच्या काही दिवसात पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंब बाग तोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार असून लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनतीवर पूर्णता पाणी फिरणार असल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.यंदा पावसाने सर्वत्रच पाठ फिरवल्याने येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत आहे. दिवसेदिवस उन्हाची दाहकता वाढत चालल्याने डाळिंब बागेतील रोपांची हिरवी पाने सुकू लागली आहेत. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकºयांचे भवितव्य दुष्काळ परिस्थितीमुळे यंदा पालखेड आवर्तनावर अवलंबून होते.परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील यंदा खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिल्याने शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून ज्या शेतकºयाजवळ तुरळक पाणी आहे. ते शेतकरी आपल्या पिकांना ड्रीपच्या आधारे थेंब थेंब पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा डाळिंब बागाचे वर्षातून एकच पिक घेऊन गोंधळात पडण्यापेक्षा दुसºया पिकांचा विचार करु लागले आहेत. जळगाव नेउर, नेउरगाव, एरंडगाव, मानोरी बुद्रुक, देशमाने, पिंपळगाव लेप, भिंगारे, चचोंडी, शिरसगाव लौकी, जऊळके आदि परिसरात शेतकºयांची हजारो एकर द्राक्षे आणि डाळिंब बागाची लागवड यंदा पाण्याअभावी धोक्यात आली असून उष्णता अशीच कायम राहिल्यास डाळिंब बागावर नक्कीच कुºहाड चालवण्याची वेळ शेतकºयावर येणार आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबाच्या झाडांना खोडकीड तसेच तेल्या सारख्या भयंकर रोगांनी थैमान देखील घातल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला होता. या भयंकर रोगांना आळा घालण्यासाठी महागडी कीटकनाशके, औषधे फवारणी करून डाळिंब बाग मातीमोल होताना दिसत आहे. त्यामुळे डाळिंब फळ धरून विक्र मी उत्पादन घेण्याचा निर्णय अंगाशी आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे दिसून येत आहे.कोट....एक महिन्यापासून उष्णता प्रचंड वाढल्याने या उष्णतेचा परिणाम विहिरीतील पाण्यावर होत असून डाळिंब बागाला दिवसेदिवस पाणी कमी पडत असून झाडे सुकू लागली आहेत. झाडांची पाने देखील अपोआप गळून झाड मोकळे होत आहे. अजून पंधरा दिवस बाग दम धरेल एव्हडेच पाणी मिळेल शिल्लक असून उन्हाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास परिणामी डाळिंब बाग हातातून जाण्याची शक्यता वाटू लागली आहे. त्याकरीता पालखेडमधून आवर्तन सोडणे गरजेचे झाले आहे.-------- सागर जाधव, शेतकरी.